Water Conservation : टंचाईच्या संकटात साठवण क्षमतावाढीसाठी उपाययोजना

Er Dayasagar Dama : सोलापुर जिल्ह्यात जलसंधारणाची (नवीन/दुरुस्ती/गाळ काढण्याची) ८७८ कामे निश्‍चित केली असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा यांनी दिली.
जलसंधारण
जलसंधारणAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जलसंधारणाची (नवीन/दुरुस्ती/गाळ काढण्याची) ८७८ कामे निश्‍चित केली असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दयासागर दामा यांनी दिली.

जलयुक्त शिवार टप्पा दोनचा ९५ कोटी रुपयांचा आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झाला आहे. यातून जवळपास ३५०० कामे घेतली जाणार आहेत. २०२३-२४ साठी जिल्ह्यातील ४९८ कामे हाती घेण्यात आली आहेत. जवळपास २१ कोटी रुपयांची ही कामे असून, यामध्ये नवीन कामे, पूर्वीच्या कामांची दुरुस्ती यांचा समावेश आहे.

जलसंधारण
Water Conservation : राजस्थानातील आलमपूरमध्ये कौटुंबिक संपन्नता

राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून गेल्या वर्षी ६१ प्रकल्पातून १७ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या वर्षीसाठी ८५ कामे निश्‍चित करण्यात आली आहेत. या कामांमधून जवळपास २१ लाख घनमीटर गाळ काढला जाईल.

मार्च अखेरपूर्ण ही कामे पूर्ण करून आगामी पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील जलसाठ्याची क्षमता वाढविली जाईल, अशी माहितीही जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी दिली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली होती. या कामांना आता पाच वर्षे झाली आहेत.

जलसंधारण
Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट

यातील बहुतांश कामांच्या ठिकाणी गाळ साठला आहे. टंचाई निवारण कार्यक्रमातून जलयुक्त शिवार टप्पा एकमधील २९५ कामांमधील गाळ काढला जाणार आहे. सध्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिल्याने येत्या काळात जिल्ह्याची पशुधन व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा, सिंचन सुविधा यासह भूजल पातळी वाढविण्यास मोठी मदत होईल असा विश्‍वासही जिल्हा जसलंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी व्यक्त केला.

संकटात शोधली संधी

या वर्षी पाऊस कमी झाला. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे टंचाईचे संकट आता डोळ्यासमोर आहे. संकटातून संधी शोधून आगामी काळासाठी जिल्ह्याला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी मृद्‌ व जलसंधारण विभागाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com