ॲग्रो विशेष

Drought Situation : दिवाळी तोंडावर, खर्चायला हाती काहीच नाही

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar News : तुम्हाला काय सांगावं. दिवाळी तोंडावर आली पण दिवाळी म्हणून वाटनांच. खर्च करायला काही हातीच नाही तर खर्च करावं तरी कुठून. पिकच झालं नसल्यानं कर्ज भरायची व्यवस्थाच नाही. टोमॅटोच्या पिकात घरातून दीड लाख गेले. मिरची दोन तोड्यात थांबली आता तिला पाणी नाही.

कापसाची तर दैनाच, कुंटल दीड कुंटल एकरी घरात आला, आता पुढे आशा नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील शिरोडी येथील भगवान कर्डीले पावसाअभावी शेतीची झालेली दुर्दशा मांडत असताना इतर शेतकरी यंदा लई अवघड होऊन बसलं म्हणतं ते सांगत असलेल्या बाबींना दुजोरा देत होते.

शिरोडीत खरीप बुडाला ...रब्बी नगण्य

गंगापूर तालुक्‍यातील शिरोडी गावात १४३ उंबरे व साधारणतः ८०० च्या आसपास लोकसंख्या. असलेल्या या गावात यंदा दिवाळसणावर संक्रांतच म्हणायची. आता पुढं कस हा प्रश्न या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. पावसाअभावी कपाशीचा एक दोन वेचणीत धुरळा झाला.

काहींनी टोमॅटो, मिरची, आले अशी पिके घेतली त्याची पावसाअभावी वाट लागली. खर्च भागलं इतकही उत्पन्न न झाल्याने झालेल्या उत्पन्नात भागवावे कसे अन् डोक्‍यावरच कर्ज फेडावे कसे हा प्रश्न आहे. गेल्यावर्षी रब्बी १७८ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली होती.

यंदा आतापर्यंत केवळ ३२ हेक्‍टर ज्वारी अन् काही भाजीपाल्याची पेरणी झाली. त्यातही जमिनीत ओल नाही, विहिरीत साठवून ठेवलेलं पाणी पुरून वापरण सुरू आहे. खरिपाच्या उत्पादनात ५० ते ८० टक्‍के घट येते आहे.

चार एकरात मोठ्या मुश्कीलीने चार क्‍विंटल मका होईल. आठ एकरांत झालेला खर्च वसूल नाही. त्यात मका काढून ज्वारी पेरणी तर ती पंधरवड्यापासून उगवलीच नाही.
अर्जून महेर शेतकरी, शिरोडी-मलकापूर, ता. गंगापूर
चार एकर कपाशी, दोन एकर मका, एक एकर तूर. मकाचं कणीस पावसाच्या खंडाने पोसलच नाही. तीन कुंटलही होणार नाही. कपाशीची स्थिती भयंकर आहे. दोन कुंटल कापूस घरात आलायं, एक दीड कुंटल येईल. तुरीला फूल पण पाणी नाही जमिनीत ओल नाही. ज्वारी पेरली ती उतरलीच नाही. -
लखन कुमावत, शिरोडी, ता. गंगापूर
अडीचं मिली पाऊस पडला की पावसाचा दिवस यानं मोठा घात केला. पावसाचे अनेक खंड राहिले खर्च केला ते वसूल नाही. ज्वारी उगवली नाही, दुबार पीक नाही. एकरातून एक दीड क्‍विंटल कापूस येतोय. तलावात पाणी नाही पिण्याच्या पाण्याचे वांधे आहेत.
- विजय वैद्य, नामदेव बत्तीसे, शिरोडी, ता. गंगापूर.

उत्पन्न खर्चाचं गणीत कोलमडलं...

कुटुंबाकडील १५ एकर व ठोक्‍याची १० एकर अशी २५ एकर शेती कसणारे भगवानराव कर्डीले यांनी दीड एकर टोमॅटो पीक घेतले. त्यावर जवळपास तीन साडेतीन लाख खर्च झाले. उत्पन्न केवळ सव्वा ते दीड लाख हाती आले.

१७ एकर कपाशीतून १८ क्‍विंटल कापूस हाती आला. कपाशीवर जवळपास पावणेदोन लाख खर्च झाला. पीककर्ज जवळपास ६ ते ७ लाख यंदा फेडण्याची व्यवस्थाच नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT