Seed Treatment  Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Treatment : सांगलीतील शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे मिळणार धडे

Rabi Season : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत काढणी अंतिम टप्प्यात पूर्ण होईल. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी गेल्या आठ दिवसांपासून सुरू झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यात रब्बी हंगामाची कृषी विभागाने तयारी केली आहे. यंदाच्या हंगामात कृषी विभागाकडून १३ हजार हेक्टरवर ज्वारीचे तर हरभऱ्याचे ३०० ते ४०० हेक्टरवर बीज प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम सुरू केले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत काढणी अंतिम टप्प्यात पूर्ण होईल. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी गेल्या आठ दिवसांपासून सुरू झाली आहे. खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत रब्बी हंगामात प्रामुख्याने रब्बी ज्वारीची पेरणी लवकर सुरू होते. या तालुक्यांत ज्वारीची पेरणीही सुरू झाली आहे.

दरम्यान, ज्वारी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीज प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. त्यातून त्यांना मार्गदर्शन आणि लागवडीचे तंत्रज्ञानही सांगितले जात आहे.

त्यामुळे बियाण्यांची उगवणक्षमता समजण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात ज्वारीचे १३ हजार हेक्टरवर बीज प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहे. त्यासाठी १३०० क्विंटल बियाणे वाटपही केले आहे. हरभऱ्याचे ३०० ते ४०० हेक्टर तर करडईचे १२० हेक्टरवर बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकही घेतले जाणार आहे.

रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा आणि करडईचे या पिकांचे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये याबाबतची जगजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT