Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात नांदेडला शेतकरी आक्रमक

Farmer Protest : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे शासनाच्या आदेशाची होळी करत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात बोंब मारो आंदोलन करण्यात आले.

शक्तिपीठ महामार्ग हा वर्धा ते गोवा असा प्रस्तावित आहे. या महामार्गात नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. परंतु या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत.

बुधवारी अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी महामार्गासंदर्भात काढलेल्या शासन आदेशाची होळी करत सरकार विरोधात बोंबमारो आंदोलन केले. या आंदोलनात नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी सहभागी झाले होते.

शक्तिपीठ हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर काही मोजक्याच लोकांच्या हितासाठी हा मार्ग लादण्यात येत आहे. या महामार्गात हजारो कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या वेळी केला.

कृषिदिनी ‘रास्ता रोको’

शक्तिपीठ महामार्गाविरोधात परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील बाधित शेतकरी मालेगाव येथे कृषिदिनी, १ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. यात विरोधी पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT