Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीची सहा महिन्यांपासून प्रतीक्षा

Team Agrowon

Shevagav News : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने मदत देण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांकडून दिले जात आहे. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्या नुकसानीची मदत सरकारने जाहीर केली होती. परंतु, सहा महिने होत आले तरीही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी हताश झाला आहे. अश्वासने पुरे, आता मदत कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी दहिगाव-ने परिसरात ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अतिवृष्टीत कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी पिके झोडपल्यानंतर कशीबशी जगलेली पिके हातात आली होती.

मात्र, कापसाचे भाव गडगडल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. आता पुन्हा रब्बीचा घास निसर्ग हिरावून घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी आता हाताश झाला आहे. मदत जाहीर करूनही ती मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सततचे ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरीने गहू पिकावर मोठा प्रादुर्भाव झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे गहू आडवा झाला असून, मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मागील नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही. तोच वादळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
माणिकराव गायकवाड, ढोरसडे, ता. शेवगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT