Milk Price Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Protest : दूधदरासाठी शेतकरी राज्यभर आक्रमक

Milk Producers Issue : गाईच्या दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर द्यावा, या मागणीसाठी राज्यातील अनेक भागांत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Team Agrowon

Nagar News : गाईच्या दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर द्यावा, या मागणीसाठी राज्यातील अनेक भागांत शेतकरी आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून राज्यात आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सोमवारपासून (ता. १) राज्यभर आंदोलन करणार आहे. त्यामुळे दूधदर आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

महाराष्ट्र दूध उत्पादक कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी शिखर शिंगणापूर (जि. सातारा) येथून रॅलीने जाऊन २ जुलैला लोणी (ता. राहाता) येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीसमोर अन्नत्याग आंदोलन करणार आहे. गणोरे (ता. अकोले) येथे १ जुलै रोजी शेतकरी सामूहिक उपोषण करणार आहेत.

राज्यातील पाच लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबे दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. गेल्या वर्षभरापासून दुधाला दर नाही. यंदा राज्यातील अनेक भागांत दुष्काळाशी सामना करून दूध व्यवसाय जपला. उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन घटते, शिवाय लग्नसराई यामुळे दुधाला मागणी असते. असे असतानाही दुग्धजन्य पदार्थाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत संपूर्ण उन्हाळ्यात दुधाचे दर खरेदीदारांनी पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पशुखाद्याचे व चाऱ्याचे दर वाढलेले असताना दुधाचा दर मात्र २७ रुपये लिटरच्या आत कसा राहील त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत.

शेतकऱ्यांची खूपच ओरड झाली, संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले. मात्र ते अनुदान त्यातील किचकट अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. तीन महिने झाले अनुदान बंद आहे. आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली.

मात्र ही घोषणा शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे गेल्या आठ दिवसांतील परिस्थितीवरून दिसून येत आहे. अनुदान हे गाजर असून, त्याऐवजी दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा, अशी मागणी आहे. त्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात शेतकरी आक्रमक झाले आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने दूध प्रश्‍नावर राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर, संगमनेर, पारनेर, नेवासा भागात आंदोलन केली जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मंगळवारी (ता. २) संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राहुरीत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

तर सोमवारपासून (ता. १) गणोरे येथे या शेतकऱ्यांनी याच मागणीसाठी उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र दूध उत्पादक कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी शिखर शिंगणापूर (जि. सातारा) येथे शंभू महादेवाला सोमवारी (ता. १) दुग्धाभिषेक करून रॅलीने जाऊन २ जुलैला लोणी (ता. राहाता) येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीसमोर अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT