Milk Rate Issue : दूध दरासाठी हरेगाव फाट्यावर तीन तास रास्ता रोको

Farmer Agitation : दुधाला किमान खर्चाच्या आधारावर दर मिळावा यांसह विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेकडून मंगळवारी (ता.२५) श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा- संगमनेर मार्गावर हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत तीन तास रास्ता अडवून धरला.
Farmer Agitation
Farmer Agitation Agrowon

Nagar News : दुधाला किमान खर्चाच्या आधारावर दर मिळावा यांसह विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेकडून मंगळवारी (ता.२५) श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा- संगमनेर मार्गावर हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत तीन तास रास्ता अडवून धरला. या वेळी दूधदरासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दुग्धविकासमंत्री नगर जिल्ह्यातील असूनही दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांनी यावेळी आरोप केला.

नगरसह राज्यात गेल्या काही महिन्यापासून दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाताना शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टातून दूध व्यवसाय जोपासला असताना सरकार, दुग्धविकासमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाहीत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दुधाचा उत्पादन खर्च पाहता दुधाला किमान अधिक दर मिळावा अशी सोलापूर जिल्हा दुग्धविकास शाळेचा अहवाल आहे.

Farmer Agitation
Farmer Agitation : दूधदरासाठी आजपासून शेतकरी संघटनेचे आंदोलन

सध्या मात्र दुधाची कवडीमोल दराने म्हणजे २५ ते २७ रुपये दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे दुधाला स्वतंत्र न्यायधीकरणाची स्थापना करून (एमएसपी) किमान आधारभूत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून त्यामध्ये जामीन न मिळण्यासह जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी, ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधाला किमान प्रती लिटर ४० रुपये दर मिळाला.

Farmer Agitation
Milk Rate Issue : दूधदर वाढवून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू

शासनाने दिलेल्या पाच रुपये प्रती लिटर दुधाला दिले जाणारे अनुदान सर्व दुधाला मिळावे, वजन मापे व भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक दूध संकलन केंद्रासह चिलिंग प्लॉन्टवर तपासणी पथकाची नेमणूक करून त्या पथकामध्ये स्थानिक दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी असावा यासह विविध मागण्यासाठी आज (मंगळवारी) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. दूध दरासाठी च्या या आंदोलनासंदर्भात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर संगमनेर राहता आदी भागात गेल्या पंधरा दिवसापासून जनजागृती करत बैठक घेतल्या अनेक गावातील शेतकरी, नागरिकांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

तर तीव्र आंदोलन करू

दुधाला किमान ४० रुपयांपेक्षा अधिक प्रती लिटर दर मिळावा अशी मागणी आहे. सरकार शेतकऱ्यांऐवजी दूध संघ चालकांचे हित पाहत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने दुधाला दर द्यावा आणि दूध उत्पादकांच्या मागण्या सोडवाव्यात, जर दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघाच्या शेजारीच हे आंदोलन झाले मोठ्या प्रमाणात शेतकरी यात सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com