Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Farmers Protest : महाराष्ट्रातील शेतकरीही दिल्लीत धडकणार ; 'दिल्ली चलो' आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा

Maharashtra Farmers Support To Drlhi Farmers Protest : तीन कृषी कायदे रद्द करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : हमीभावाचा कायदा आणि इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. तीन कृषी कायदे रद्द करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या (अराजकीय) नेतृत्त्वात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी हमीभावाचा कायदा करण्याची प्रमुख मागणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचाही अप्रत्यक्षरित्या समावेश होत आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरीही दिल्लीत जाणार

पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून लवकरच महाराष्ट्रातील शेतकरीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जातील, असे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.

कांदा उत्पादक अडचणीत

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे राज्यातला शेतकरीही अडचणीत आला आहे. त्यातच डिसेंबरमध्ये राज्यातील कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा निर्यातबंदीचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कांद्यासह सोयबीन, कापूस, द्राक्ष आणि इतर शेतीमालाला मिळणाऱ्या दरांमुळे शेतकरी सध्या अडचणीत आहेत.

कांद्याला हमीभाव मिळावा

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही काळापासून सातत्याने तोट्यात आहे. कांद्याला मिळणाऱ्या दरामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यालाही हमीभावाच्या कक्षेत आणावे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळू नये, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT