Agriculture Ai Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Expo 2025 : बारामती केव्हीकेच्या ‘एआय’ शेतीबाबत शेतकऱ्यांत उत्सुकता

Ai in Agriculture : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने भारतात प्रथमच ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञान आणून याविषयी संशोधन प्रकल्प राबविला आहे. एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होऊ लागला आहे.

Team Agrowon

Baramati KVK Agricultural Innovation : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने भारतात प्रथमच ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञान आणून याविषयी संशोधन प्रकल्प राबविला आहे. एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी (ता. १०) सुरू झालेल्या ‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात उभारलेल्या अनोख्या दालनात याविषयीची माहिती घेताना शेतकरी चकित होताना दिसत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पीक उत्पादन तंत्रज्ञानाविषयी येथे इत्थंभूत माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत. या दालनातच अत्याधुनिक हवामान केंद्रही पाहण्यास मिळते. बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या माध्यमातून ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व ॲग्रीपायलट एआय या तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या या तंत्रज्ञान विकासासाठी एकत्र आल्या आहेत.

त्याद्वारे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) प्रक्षेत्रात शेतीतील एआय विषयी प्रकल्प सुरू आहे. त्यातून ऊस उत्पादनात सुमारे २५ टक्के वाढ होण्यासह उत्पादन खर्चात ३० टक्क्यांपर्यंत बचत कशी होणार आहे याची माहिती दिली जात आहे. तसेच हवामान बदलामुळे शेतीतील समस्यांना तोंड देण्यासाठी बळ मिळत असल्याचे शेतकऱ्यांच्या ध्यानात येते आहे असे ‘केव्हीके’चे शास्त्रज्ञ संकेत भोसले यांनी सांगितले.

जमिनीची सुपीकता, मातीमधील अन्नद्वव्ये, सेंद्रिय कर्ब, सामू, क्षारता आदी विविध घटकांच्या तपशिलासह कोणत्या जमिनीत कोणते पीक कधी घ्यायचे आणि त्याचे व्यवस्थापन याबाबतही या तंत्रज्ञानाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ‘केव्हीके’शी ९५२९३८२५३० या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Labor Wages: झुनका गावात ठरले मजुरी दर अन् तास

Papaya Rate: खानदेशात पपई दर किलोला १६ ते १८ रुपये

Banana Export: सातपुड्यातील पंचाळातून केळीची आखाती देशात निर्यात

Monsoon Rain: दमदार सरींनी पिकांना दिलासा

Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

SCROLL FOR NEXT