Chhatrapati Sambhajinagar News: शिक्षणातील आव्हाने स्वीकारत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणारे आयडॉल शिक्षक शाळेसमवेत समाजातही बदल घडवून आणतील. समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. .तापडिया नाट्यमंदिर येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदींसह राज्यभरातील आयडॉल शिक्षक म्हणून निवड झालेले शिक्षक उपस्थित होते..Teachers Award : शिक्षकांवर सामाजिक विकासाची जबाबदारी.श्री. भुसे म्हणाले, ‘‘राष्ट्र प्रथम हा शिक्षण पद्धतीचा गाभा आहे. पीएमश्री योजनेच्या धर्तीवर राज्यातही सीएमश्री योजनेच्या माध्यमातून ५ हजार शाळांच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. यूपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले जवळपास ६० टक्के उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतून शिकलेले आहेत, यावरून शासकीय शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते हे कळते. गरीब विद्यार्थी शिकला तर त्यांच्या कुटुंबाचीही प्रगती होते. बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण देण्यावर भर असणार आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्याचा दृष्टीने शिक्षक भरतीमध्ये कला व क्रीडा शिक्षक भरतीस प्राधान्य दिले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास.ZP Teachers Award : जिल्हा परिषदेचे तीन वर्षांचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.देशपातळीवर शिकविला जावा यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे.’’ शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या शासनाच्या योजनांची माहिती, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत तसेच त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवावी. शाळांमध्ये वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय.जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्री. भोयर म्हणाले, ‘‘शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम हे शिक्षकांच्या माध्यमातूनच होत आहे. उपक्रमशील शिक्षकांमुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढली आहे. १ हजार शाळांमध्ये एआय लॅब सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. भविष्यात संशोधक विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये वेळोवेळी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’’.चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह (ता. जिवती) गावातील, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला सुस्थितीत आणण्याचा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आदर्श निर्माण करणारे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी, गडचिरोली येथील शिक्षक खुर्शिद शेख, नाशिक जिल्ह्यातील हिवाळी (त्र्यंबकेश्वर) गावातील केशव गावित, तर पुणे जिल्ह्यातील जालिंदरनगर खेड येथील वाबळेवाडी शाळेचे वारे गुरूजी या आयडॉल शिक्षकांचा श्री. भुसे यांच्या हस्ते या वेळी गौरव करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.