Parbhani News: सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाच्य्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रब्बी हंगाम २०२५ मधील पिकांच्या सिंचनासाठी ४ पाणी आवर्तने देण्याचे नियोजन आहे. .परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर, परभणी या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ मिळणार आहे. त्यानुसार पीक नियोजन करून पाणी मागणी अर्ज करणे गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले..परभणी येथील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यक्षेत्रात कार्यान्वित (प्रगतीत) असलेल्या निम्न दुधना प्रकल्पामध्ये या वर्षी सुमारे ७५ टक्के साठा उपलब्ध आहे..Dudhana Dam Water Level : निम्न दुधना प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा .त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील सेलू, मानवत, जिंतूर, परभणी या तालुक्यांतील उभ्या पिकांसाठी ४ पाणी आवर्तने देण्याचे नियोजन आहे..Lower Terna Project : ‘निम्न तेरणा’च्या दुरुस्तीची दुसरी निविदाही निघाली .लाभधारक शेतकऱ्यांनी शक्य असेल तेथे प्रवाहाने अथवा उपसाद्वारे पाणी घ्यावयाचे आहे. यासाठी गरजू लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज नमुना ७ अ मध्ये पीकक्षेत्र नोंदवून परिपूर्ण अर्ज तत्परतेने परभणी येथील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० अंतर्गत संबंधित उपविभागात सादर करावेत..पाणी अर्ज संबंधित उपविभागात विनामूल्य मिळतील. रब्बी हंगामाची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत राहील. नमुना ७ अ प्राप्त झालेल्या अर्जास शर्ती व अटींच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना चालू हंगामातील कालव्याचे पाणी घेतलेल्या पिकांची पाणीपट्टी भरावी लागेल. मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे. मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी (कालवा, नदी, नाले) अर्ज मंजुरी घेऊनच पाणी वापर करावा, असे माजलगाव कालवा विभाग परभणीचे उप कार्यकारी अभियंता थेटे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.