Bulldana News: खुल्या बाजारात सोयाबीन साडेचार हजारांच्या आसपास विकते आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासकीय केंद्रावर मिळणारी आधारभूत हमीभाव किंमत अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी या केंद्रावर जात आहेत. मात्र या केंद्रावर लावल्या जाणाऱ्या अटी आणि ग्रेडिंगमधील अडथळ्यांमुळे मोठा पेच निर्माण झालेला आहे. तालुक्यात या प्रकारामुळे सोयाबीनची जेमतेम खरेदी होऊ शकली आहे. .या तालुक्यात सध्या दोन खरेदी केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यातील संग्रामपूर खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर नोंदणी केलेल्या १ हजार ९०० शेतकऱ्यांपैकी केवळ ७५ जणांचाच माल आणण्यासाठी संदेश देण्यात आला. त्यापैकी फक्त २५ शेतकरी सोयाबीन घेऊन पोहोचले. या २५ शेतकऱ्यांचा मिळून केवळ १०० क्विंटल माल खरेदी करण्यात आला. सात दिवसांत झालेली ही अत्यल्प खरेदी सर्वांचीच चिंता वाढविणारी ठरली आहे. याचसोबत पातुर्डा येथील दुसऱ्या केंद्रावरही परिस्थिती तितकीच बिकट आहे. या केंद्रावर एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ५२ शेतकऱ्यांचा माल ग्रेडरकडून पास करण्यात आला. परंतु धक्कादायक बाब म्हणजे हा माल गोदामात पाठविल्यावर गोदाम व्यवस्थापनाने तो परत पाठविल्याचे सांगितले जाते..Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर.दरवर्षी या भागात चांगल्या दर्जाचे सोयाबीन उत्पादन होते. परंतु या मोसमात दर्जा थोडा कमी आहे. नेमकी हीच बाब या खरेदीत अडथळा बनली. सोयाबीनमध्ये माती, केरकचरा, डागी अशी विविध कारणे पुढे करीत केंद्रावरील ग्रेडर शेतकऱ्यांचा माल नाकारत आहेत. शेतकरी स्वतः चाळणी करून, स्वच्छ केलेला माल देण्यास तयार असतानाही हे ग्रेडर ऐकायला तयार नाहीत. दिवसेंदिवस माल परत करण्याचे प्रमाण वाढले आहे. तुलनेने खरेदी मात्र नगण्य प्रमाणात होत आहे..Soybean Procurement: फक्त दोन केंद्रांवर ४७ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी .शेतकऱ्यांची व्यथामातीत पेरलेला माल एकदम चकाचक कसा येईल, आता सोयाबीन धुऊन आणावे की पुसून, असा सवाल शेतकरी करताना दिसत आहेत. नाकारलेल्या मालाचे वाढते प्रमाण पाहता संस्थांची चिंता वाढणार आहे. कारण सदर ग्रेडरचा पगार आणि इतर कर्मचारी यांचा पगार संस्थेला मिळणाऱ्या कमिशनमधून करावा लागतो. खरेदीच झाली नाही तर उत्पन्नाचे काय, खरेदीबाबत यंदा लावलेले नियम पाहता सरकारला माल घ्यायचा नाही का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत..नाफेडच्या केंद्रावर असलेला प्रतिनिधी म्हणजेच ग्रेडर हा नाफेडकडून देण्यात आलेला आहे. ते वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांप्रमाणे खरेदी प्रक्रिया राबवत आहेत. माल रिजेक्ट झाल्यानंतर शेतकरी स्थानिक प्रशासनावर रोष व्यक्त करतात. यातून काही मार्ग निघतो का, यासाठी प्रयत्न करीत आहोत.- विश्वासराव वरणकर पाटील, अध्यक्ष, खरेदी-विक्री संस्था, संग्रामपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.