Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Fund : केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

Drought Relief Subsidy : शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंक खात्याची ‘केवायसी’ करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंक खात्याची ‘केवायसी’ करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात केवायसी लिंक प्रणाली बंद आहे. परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यामधील दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाने अर्ज भरून देण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज जमा केले. त्यानंतर जिल्ह्यामधील अनेक दुष्काळी गावांच्या याद्या प्राप्त झाल्या. त्यानंतर ऑनलाइन पोर्टलला विशिष्ट क्रमांक टाकून केवायसी करण्याचे काम सुरू झाले होते. परंतु रोजच सर्व्हर डाऊन असल्यामुळे केवायसी लिंक प्रणाली बंद आहे.

पुरंदर, बारामती असे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वी शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकरी पदरचे पैसे खर्च करून ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी जात आहेत. मात्र लिंक बंद असल्याने केवायसी न करताच त्यांना परत जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. केवायसी लिंक सुरू करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दुष्काळी अनुदानासाठी सर्व्हर चालत नाही. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. त्यानुसार शासन स्तरावर काम सुरू आहे. लवकरच केवायसी पोर्टल सुरू होईल.
- वैभव थोरात, महा-ई-सेवा केंद्र चालक, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT