Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Demand : सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Soybean MSP Procurement : केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Satara News : केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीत आणि कऱ्हाड तालुक्यात सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे बाजार समितीचे पदाधिकारी आणि सहकारी संस्था उपनिबंधक यांना निवेदन देवून केली.

कऱ्हाड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजीराव चव्हाण, संचालक मानसिंगराव जगदाळे यांना शिवाजी पाटील, सुशांत इनामदार, धनाजी माने, भास्कर थोरात, प्रल्हाद माने, विश्वजित पाटील, दत्तात्रय थोरात, विक्रम पाटील व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनातील माहिती अशी ः जिल्ह्यात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली असून जिल्ह्यात तब्बल ९६ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले आहे. कऱ्हाड तालुक्यात सुद्धा सोयाबीन क्षेत्र जवळपास १० हजार हेक्टर आहे. कमी कालावधीत बऱ्यापैकी पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी करतात.

नुकताच केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी ९० दिवसासाठी हमीभाव केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीचा सोयाबीन हमीभाव ४८९२ निश्चित केलेला आहे. मात्र अलीकडे सरकारने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

खासगी व्यापारी संगनमताने हमीभाव पेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करतात. परिणामी नाइलाजाने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करून सोयाबीन विक्री करावी लागते. तरी केंद्राच्या निर्णयाप्रमाणे बाजार समिती आवारात हमीभाव केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT