Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : भात पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Crop Damage Survey : पावसाचा मोठा खंड पडल्याने माळरानावरील भात करपून गेला आहे. यापूर्वीच काही उत्पादक शेतकऱ्यांनी अशा भातात नांगर फिरवला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : पावसाचा मोठा खंड पडल्याने माळरानावरील भात करपून गेला आहे. यापूर्वीच काही उत्पादक शेतकऱ्यांनी अशा भातात नांगर फिरवला आहे. अवर्षण परिस्थितीमुळे भाताचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून शासनाने अद्याप भात पिकाच्या पंचनाम्याचे आदेश दिलेले नाहीत.

भात पीक शेतात आहे, तोपर्यंत पंचनाम्याचा निर्णय तत्काळ घ्यावा आणि शेतकऱ्यांना रब्बी पिक घेण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गडहिंग्लज तालुक्यात ऊस, सोयाबीननंतर तिसऱ्या क्रमांकाचे खरीप पीक म्हणून भाताचे उत्पादन घेतले जाते. साधारण आठ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये यंदा भात लागवड झाली आहे. यातील ४० टक्के भाताचे क्षेत्र केवळ पावसावर अवलंबून असलेल्या माळरानावर असते. उर्वरित क्षेत्र पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रातून पिकवले जाते.

यावर्षी मुळात पावसाने उशिरा हजेरी लावली. यामुळे पेरणी, रोप लावणी लांबली. जुलैमधील काही दिवसाच्या पावसाने भाताची उगवण, वाढ चांगली झाली. मात्र त्यानंतर दीड महिना पावसाने दडी मारली. यामध्ये पाणी असलेल्या क्षेत्रातील भात टिकले, तर केवळ पावसावर अवलंबून असलेले भात पीक मात्र करपून गेले.

तालुक्याच्या पूर्व भागातील बुगडीकट्टी, तुपूरवाडी, तेगीनहाळ, मासेवाडी, उंबरवाडी, तेरणी, कळवीकट्टे आदी भागांतील भात पिकाची अवस्था शेतकऱ्यांना पहावेना. अर्ध्यावर आलेला भात काढून टाकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शेतकऱ्यांना या क्षणाला तरी दिसत नाही.

माळरानावरील भाताची वाढ खुंटल्यानेच मासेवाडी, महागाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी पिकातच नांगर फिरविला. अशाच निर्णयाच्या दिशेने अनेक शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. पंचनाम्यासाठी शेतात पीक असल्याचे पुरावे लागतात. भात पीक नांगर मारून काढले आणि नंतर पंचनाम्याचे आदेश आले तर पीक दाखवायचे कसे, हा प्रश्न आहे. म्हणून शासन पंचनाम्याचे आदेश कधी देणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT