Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Demands: नवीन कृषिपंप ग्राहकांना सौर सक्तीची अट रद्द करा

Agriculture Pumps : नवीन कृषिपंप ग्राहकांना सौर सक्तीची अट रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने केली आहे. याबाबतचे फेडरेशनच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

Team Agrowon

Kolhapur News: नवीन कृषिपंप ग्राहकांना सौर सक्तीची अट रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने केली आहे. याबाबतचे फेडरेशनच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्य शासनाने शेतीपंपांना नवीन वीज कनेक्शन घेताना सौर जोडणी सक्तीची केली आहे.

मात्र, नदीकाठावरील पंपांसाठी सोलर अशक्य आहे. २०२४ मध्ये महावितरणने कृषी पंपाला फिडरद्वारे सर्व्हिस कनेक्शन देण्याचे थांबवले आहे. सौर जोडणी घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. शासनाने सौरच्या बाबतीत चांगले धोरण आणले आहे.

ज्या शेतकऱ्यांना कृषीपंप कनेक्शन पाहिजे, त्यांच्यासाठी १० टक्के रक्कम ग्राहकाने भरून उर्वरित ९० टक्के शासन भरणार आहे आणि सोलर पॅनल आणि मोटर देणार, पॅनल बसाविण्याची जागा ग्राहकाने उपलब्ध करून देण्याची आहे, अशी अट आहे.

नदी काठावर ज्यांना कनेकशन पाहिजे त्या ठिकाणी पूर येत असल्याने तिथे पॅनेल बसविणे शक्य नाही. तसेच अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. मुळात जमीन कमी असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पॅनेल बसाविणे शक्य नाही. अशा स्थानिक अडचणीमुळे कृषी ग्राहकांची महावितरणकडून कोंडी झाली आहे.

तरी, आपण सौर जोडणीची सक्ती करू नये आणि त्या ग्राहकांचे स्थळ पाहणी करून पूर्वीप्रमाणे फीडरवरून सर्व्हिस कनेक्शन द्यावे. अन्यथा राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. या वेळी देण्यात आला आहे. इरिगेशन फेडरेशनचे प्रमुख विक्रांत पाटील (किणीकर), राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT