Agriculture Land Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : जीव देऊ, पण जमिनी देणार नाही

Chennai-Surat Greenfield Highway : सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला स्वीकारण्यासाठी वारंवार आव्हान दिले जात आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला स्वीकारण्यासाठी वारंवार आव्हान दिले जात आहे. जमीन बळजबरीने हस्तांतरित करण्यात येईल, अशी तंबीदेखील दिली जात असताना कुटुंबासोबत जीव देऊ, परंतु अत्यल्प दरात जमीन देणार नाही,’’ असा इशारा आता संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे व ओमप्रकाश पाटील यांनी दिला.

जिल्हा प्रशासनाकडून वारंवार मोबदला स्वीकारण्यासाठी दबाव वाढत असताना नुकतीच सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी आदी तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांची पुढील रणनीतीविषयी बैठक पार पडली. या बैठकीला राजन क्षीरसागर-परभणी, नारायणराव विभूते-वाशीम, विलास गावडे-वाशीम, बाबासाहेब धोंडे-राहुरी, दादासाहेब बंदे-अकलूज व जोशी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी बहुसंख्य बाधित शेतकरी उपस्थित होते.

हा महामार्ग हा सार्वजनिक प्रयोजनाचा रस्ता नसून, व्यावसायिक प्रकल्प आहे. केवळ मोबदल्याचा विषय नाही, तर रस्त्याच्या निर्मितीमुळे अनंत अडचणी येणार आहेत. भूसंपादन करताना फेरमूल्यांकन करून बिगरशेती दराप्रमाणे मावेजा मिळावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी या वेळी केली.

जिल्ह्यातील खासदार व चारही बाधित तालुक्यांतील आमदारांनी एकजूट दाखवून सरकारला याविषयी जाब विचारण्याची गरज आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. ही जमेची बाजू असून लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी पार पाडावी. अन्यथा, आम्हालाच आता निर्णय घ्यावा लागेल.
ओमप्रकाश पाटील, शेतकरी
अत्यल्प मोबदल्याचा विषय घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आवश्यक लोकप्रतिनिधींची भेट घेतली. वास्तव, परिस्थिती कळविली आहे. परंतु या विषयावर सरकार गंभीर नाही. यासंदर्भात बैठक घेऊन योग्य मार्ग काढणे गरजेचे असताना काहीच होत नाही, हे गंभीर आहे. परिस्थिती चिघळण्याअगोदर मार्ग निघावा, ही अपेक्षा.
बाळासाहेब मोरे, अध्यक्ष, संघर्ष समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT