Land Acquisition : शेळगाव बॅरेजसाठी १२ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन

Shelgaon Barrage : तापी नदीवरील शेळगाव (ता. जळगाव) बॅरेज शंभरमध्ये पाणी साठण्यासाठी धरणाला अजून ११.९४ हेक्टर जमिनी हवी होती. ती जमीन नागपूर वन विभागाने दिली आहे.
Shelgaon Barrage
Shelgaon Barrage Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : तापी नदीवरील शेळगाव (ता. जळगाव) बॅरेज शंभरमध्ये पाणी साठण्यासाठी धरणाला अजून ११.९४ हेक्टर जमिनी हवी होती. ती जमीन नागपूर वन विभागाने दिली आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करीत राज्य शासनाने अतिरिक्त जागेला परवानगी दिली. प्रशासनाने तीन महिन्यांत वन विभागाची जमीन मिळवून दिली. या अतिरिक्त जमिनीमुळे धरणात शंभर टक्के साठा होईल, अशी माहिती मिळाली.

तसेच जळगाव, यावल, भुसावळ, चोपडा गावांमध्येही सिंचनाची मोठी सोय होईल. अनेक पिढ्यांसाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पात असणाऱ्या ११.९४ हेक्टर वनजमीन अधिग्रहित करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाला नांदेडची जिल्ह्यातील महसूलची जमीन वन विभागाला द्यावी लागणार आहे. नांदेडचे जिल्ह्याधिकाऱ्यांचेही यात श्रेय आहे.

Shelgaon Barrage
Water Crisis : शेळगाव, वरखेडे बॅरेजमध्ये जलसाठा होईना

ही जमीन शेळगाव बॅरेजला मिळण्यासाठी २०१८ पासून प्रस्ताव प्रलंबित होता. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. नागपूरच्या वनविभागाच्या बैठकीही घेतल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करीत ही जमीन वन विभागाकडून मिळवली.

Shelgaon Barrage
Water Crisis : ‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास जलसमाधी

केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच शेळगाव प्रकल्पातील जलसाठा १०० टक्के क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धरण परिसरात वनजमिनीच्या जागेमुळे शेळगाव धरणातील साठा पूर्णक्षमतेने भरण्यास अडचण येत होती. हा प्रस्ताव नवी दिल्ली येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

पाणीटंचाई मिटेल, सिंचनास मदत

शेळगाव बॅरेज तापी नदीवर आहे. यामुळे एक हजार १२८ हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव, भुसावळ येथील औद्योगिक विकास महामंडळ, खासगी औद्योगिक वसाहती, खासगी उद्योग, भुसावळ शहर, भुसावळ रेल्वे जंक्शन, रेल्वे वसाहतीसाठी धरणाच्या आसपास असलेल्या जळगाव, भुसावळ व यावल तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी हा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com