Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : कापूस वेचणीची मजुरी परवडेना

Labor Wage : एक क्विंटल कापसाची वेचणी केल्यास त्यातील ३० टक्के कापूस मजुरांचा असा फॉर्म्युला शेतमालक व मजुरांत होत आहे.

Team Agrowon

Nandurbar News : खानदेशातील अनेक भागांत कापसाची वेचणी सुरू आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अधिकची मजुरी द्यावी लागत असून, यात वेचणी झालेल्या कापसाच्या एकूण उत्पन्नातील ३० टक्के उत्पन्न मजुरांच्या हिश्श्यावर जात आहे.

एक क्विंटल कापसाची वेचणी केल्यास त्यातील ३० टक्के कापूस मजुरांचा असा फॉर्म्युला शेतमालक व मजुरांत होत आहे. मागील महिन्यात हा प्रकार सुरू झाला. आता काही शेतकऱ्यांचाच कापूस शेतात आहे. परंतु हा ७०-३० चा फॉर्म्युला कायम आहे.

शेतकरी आणि मजुरांमध्ये आलेल्या एकूण उत्पनातून वाटणी होत असल्याने शेतकऱ्यांना कापूस प्रतिक्विंटल चार हजार रुपये पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. आशात कापूस पिकाला लागलेला खर्चही काढणे अवघड झाले आहे.

हा फॉर्म्युला खानदेशातील सातपुड्यालगच्या अनेक गावांत पोचला आहे. काही शेतकऱ्यांनी मात्र यास विरोध केला असून, यात शेतकऱ्यांचा तोटा आहे. हा चुकीचा प्रकार आहे, असा मुद्दा उपस्थित केला आहे. खानदेशात मजूरटंचाई कायम आहे. पुढील कालावधीत अधिकची मजूरटंचाई असेल.

दुहेरी फटका

पावसामुळे खानदेशात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशात रब्बीची तयारी शेतकऱ्यांनी केली. जेवढा येईल तेवढा कापूस काढून शेताची मशागत करून उन्हाळ पिकेही पेरली आहेत. ७० -३० च्या फॉर्म्युल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मशागत, बियाणे, मजुरी, खते, फवारणी, वेचणी या सर्वांची बेरीज करता कापूस पिकात शेतकऱ्यांना कुठलाही आर्थिक लाभ होणार नसल्याची स्थिती असून, पीक तोट्यात गेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT