Loan Waiver Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Waiver Protest : माजलगावात कर्जमाफीसाठी चक्का जाम आंदोलन

Farmers Protest : प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता.२४) माजलगाव तालुक्यातील वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे सकाळी ११ः३० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Beed News : प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता.२४) माजलगाव तालुक्यातील वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे सकाळी ११ः३० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनात शेतकरी तसेच दिव्यांग बांधव, मेंढ्या सहित मेंढपाळ मालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनामध्ये शेतकरी नेते भाई गगाभिशन थावरे, एडवोकेट नारायण गोले पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख नारायण होके पाटील, आझाद क्रांती सेनेचे राजेजी घोडे, शेतकरी क्रांती सेनेचे योगेश कानडे, वीर शंभु संघटनेचे गणेश शिंदे, आजाद क्रांतीचे तालुकाध्यक्ष अशोक ढगे, मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नोमान चाऊस व पदाधिकारी तसेच आजी माजी सैनिक संघटनांनी वसंतराव नाईक चौक परभणी फाटा माजलगाव येथे येऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.

हे आंदोलन माजलगाव प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष गोपाळ पैजणे, नितीन कांबळे, भारत डोंगरे हरिचंद्र जाधव विजय जोगडे अशोक अर्जुन लक्ष्मण गरड, विकास जगताप, विलास लवाळे, श्रीराम कोरडे, युवराज राठोड, महादेव डाके, पांडुरंग कुकडे, गणेश नागणे, अनेक शेतकरी व दिव्यांग बांधव पदाधिकारी सहभागी झाले होते.

वडिगोद्री येथेह ‘चक्का जाम’

जालना जिल्ह्यातील अंबड येथील जालना-बीड महामार्गावर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन केले गेले. वडिगोद्री येथेही चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT