Farmers Loan Waiver Protest Agrwon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver Protest : कर्जमाफीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

Farmers Protest Ahilyanagar : सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळले जात नाही. शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली केली जात असल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळले जात नाही. शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली केली जात असल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कर्जवसुलीसाठी येणाऱ्या बॅंकाच्या अधिकाऱ्यांना श्रीरामपूर तालुक्यातील गावांत कर्जवसुलीसाठी येण्याला बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.

संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी केली जात आहे. महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र त्याकडे आता दुर्लक्ष केले जात आहे.

उलट शेतकऱ्यांच्या कर्जाची बॅंकाकडून वसुली केली जात असल्याचे सांगत श्रीरामपूर तालुक्यात स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

त्यामुळे आता श्रीरामपूर तालुक्यातील गावांत बॅंकेच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा देत रविवारी सरला , गोवर्धन, रामपूर, नाऊर, महांकाळ वडगाव गावांच्या वेशीवर अधिकाऱ्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत. गावच्या परवानगी शिवाय कर्ज वसुलीअधिकाऱ्यांनी गावात प्रवेश करूच नये असा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT