Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांनी रोखले शक्तिपीठ महामार्गाचे सीमांकन

Land Acquisition Protest: परभणी जिल्ह्यातील १५ गावांतील शेतकऱ्यांनी पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी आवश्यक सीमांकनास विरोध केला.

Team Agrowon

Parbhani News: परभणी जिल्ह्यातील १५ गावांतील शेतकऱ्यांनी पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी आवश्यक सीमांकनास विरोध केला. त्यामुळे सिमांकनाची प्रक्रिया करता आली नाही, असे ‘महसूल’च्या सूत्रांनी सांगितले.

पवनार ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग) परभणी तालुक्यातील १५ गावांतील ४०९.३३ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

या महामार्गाच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीसाठी सीमांकन मोनार्च सर्व्हेअर्स अॅन्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लि. पुणे यांच्या मार्फत केले जाणार आहे. मंगळवार (ता. १३) बुधवार (ता. २१) या कालावधीत सीमांकन करण्यासाठी गावनिहाय स्थापन केलेली तलाठी, मंडळ अधिकारी यांची पथके

तसेच कंपनीचे कर्मचारी परभणी तालुक्यातील बाभळी, उखळद, पिंगळी, शेंद्रा, टाकळगव्हाण, सहजपूर, आमडापूर, जवळा, लोहगाव, ताडपांगरी, आंबेटाकळी, पोखर्णी, दैठणा, इंदेवाडी, साळापुरी या १५ या गावांमध्ये गेले.

तेव्हा या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे केवळ शेती हेच उपजीविकेचे साधन आहे. या महामार्गासाठी जमीन संपादित केल्यानंतर कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT