Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाबाबत प्रशासनाचे आता बैठकास्त्र

Farmers Protest : नागपूर- गोवा शक्तिपीठ मार्गासाठी भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने अधिकारी व बाधित शेतकरी यांच्यात बैठकांचा सपाटा सुरू आहे. शुक्रवारी (ता. २५) बार्शी येथे बाधित शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक झाली.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Solapur News : नागपूर- गोवा शक्तिपीठ मार्गासाठी भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने अधिकारी व बाधित शेतकरी यांच्यात बैठकांचा सपाटा सुरू आहे. शुक्रवारी (ता. २५) बार्शी येथे बाधित शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी चार ते पाच पट मोबदला देण्याची तयारी दर्शविली, तरीदेखील शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नाहीत. बार्शीतील बैठकीत हा महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लोटांगण घातले.

नागपूर- गोवा (पवनार ते पत्रादेवी) या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी १२ जिल्ह्यात भूसंपादन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर तसेच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे एकूण ३१९ गट बाधित होणार आहेत.

यापैकी उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक यापूर्वीच झाली. तर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक प्रांतअधिकारी सदाशिव पडदूणे यांनी बार्शी तहसीलदार कार्यालयात घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ मार्ग रद्दच करण्यात यावा, अशीच भूमिका घेतली.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway: शक्तिपीठ मार्गाविरोधात सिंधुदुर्गात आंदोलनाची तयारी

बार्शी तालुक्यातील बाधित गट

नागपूर-गोवा या महामार्गासाठी गौडगावचे ५५ गट, रातंजन येथील ९३ गट मालेगाव येथील ७ गट, आंबेगाव येथील दोन गट, आंबाबाईची वाडी येथील चार गट, जवळगाव येथील २३ गट, हत्तीज ४२, चिंचखोपण पाच, शेळगाव (आर.) येथील ८६ गट बाधित झाले आहेत. बार्शी तालुक्यातील एकूण ३१९ गट बाधित झाले आहेत.

बैठकींचा सिलसिला

जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्याची बैठक नुकतीच झाली असून शुक्रवारी बार्शी तालुक्याची झाली. मोहोळ, पंढरपूर येथील शेतकऱ्यांचाही संमिश्र प्रमाणात या मार्गासाठी विरोध आहे. पोखरापूर येथे एक मंदिर या महामार्गाने बाधित होत आहे. मंदिर वाचविण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : प्रसंगी रक्त सांडेल, पण शक्तिपीठला जमीन देणार नाही

‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ची घोषणा

बार्शी येथे शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीला बार्शी तालुक्यातील २०० ते २५० शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर जमिनीवर लोळून अक्षरश: लोटांगण घातले. तुमच्याकडे बंदुका आहेत. आमच्याकडे मात्र लोटांगण सोडून काहीच नाही म्हणून आम्ही तुमच्या समोर लोंटागण घालतो मात्र हा मार्ग रद्द करा, अशी विनंती करण्यात आली. यावेळी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देण्यात आल्या.

शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात सुपिक जमिनी बाधित होणार आहेत. मूळात नागपूर-रत्नागिरी हा मार्ग असताना पुन्हा नागपूर गोवा या नव्या मार्गाचा घाट का घातला जातो आहे. कोणत्याही परिस्थतीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत.
- रविराज पाटील, बाधित शेतकरी, हत्तीज ता. बार्शी
शेतकऱ्यांची भूमिका आम्ही शासनापर्यंत पोचविणार आहोत. शेतकऱ्यांनी स्वत:हून जमिनी एमएसआरडीसीला दिल्या तर रेडीरेकनरच्या चारपट मोबदला देऊन २५ टक्के प्रोत्साहन मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
- सदाशिव पडदुणे, भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्र. १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com