Monsoon Rain Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain Kolhapur : पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत, मॉन्सूनची प्रतीक्षा कायम

Kolhapur Monsoon : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यातील पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे.

sandeep Shirguppe

Kharip Season Kolhapur : महाराष्ट्रातील काही भागात मॉन्सूनचे आगमन जोरदार झाले परंतु राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मात्र अद्याप मॉन्सूनची चाहूल कायम आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील घाट माथा सोडल्यास अनेक तालुक्यांना जोरदार पावसाची अपेक्षा लागून राहिली आहे. धुळवाफ केलेल्या बियाणांची उगवण होत असल्याने पाण्याची कमतरता भासत असल्याने पिके करपण्याची भिती लागून राहिली आहे. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मागच्या ८ दिवसांपासून पावसासाठी अपेक्षित वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे मॉन्सून सुरू होण्याची हवामान विभागाने दिलेली वेळ टळून गेली आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहिल्याने उन्हाचा तडाखा जाणवला.

पावसाअभावी भात, भुईमूग, सोयाबीनला कृषीपंपद्वारे किंवा डिझेल इंजिनद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची जास्त नोंद झाली असली तरी शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने प्रतिक्षा कायम राहिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यातील पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळेल, असा पाऊस होत नाही. कोकणातही गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात मॉन्सूनला सुरुवात होईल, असे वातावरण होते. वातावरणात बदल झाला असून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. जिल्ह्यात आता खरिपाची पेरणी अंतिम टप्‍प्यात आली आहे. महिन्यापासून पेरण्या सुरू आहेत. यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. जेवढा पाऊस होईल तेवढी पिकांना उभारी मिळणार आहे.

विशेषत: माळरानातील पिकांना पाण्याची गरज भासत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषीपंप किंवा डिझेल इंजिनद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यादरम्यान पावसाचे प्रमाण चांगले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरण्याही लवकर सुरू केल्या आहेत. पावसाअभावी या पेरण्यांना फटका बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PJTAU AI Laboratory : तेलंगणातील कृषी विद्यापीठाने उभारली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातील पहिली प्रयोगशाळा

VB G RAM G Bill: व्हीबी- जी राम जी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Soybean Procurement: सोयाबीन खरेदीचा गोंधळ कायम

Rural Development: ग्रामविकासातील अडचणी सोडवा

Nagarpalika Elections Result: भाजपचा नगर परिषद, नगरपंचायतींत वरचष्मा

SCROLL FOR NEXT