Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : नगर जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले वाढल्याने नागरिक, शेतकरी त्रस्त

Leopard Terror : नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, पारनेर या तालुक्यांत बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. पशुधनासह माणसांवर दर दोन दिवसांनी एक हल्ला होत असल्याने शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, पारनेर या तालुक्यांत बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. पशुधनासह माणसांवर दर दोन दिवसांनी एक हल्ला होत असल्याने शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत.

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याने वन विभागावर नागरिक रोष व्यक्त करत असून बिबट्यापासून सुटका कशी मिळणार, याची लोकांनी चिंता लागली आहे. अकोले तालुक्यातील वीरगावात शुक्रवारी (ता. २०) दोन शेतकरी बिबट्याच्या हल्ल्याने गंभीर जखमी झाले आहेत. बस्तीराम रामचंद्र गांगड, माधव पोपट देशमुख हे नेहमीप्रमाणे शेतात जात होते. या दोघांवर बिबट्याने हल्ला केला.

या हल्ल्यात गांगड व देशमुख जबर जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने संदीप वाकचौरे आणि सार्थक वाकचौरे यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बचावले. पारनेर तालुक्यातील गाडीलगाव (ता. पारनेर) येथे शुक्रवारी (ता. २०) शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक शेळी ठार झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

शांताराम शिंदे हे सकाळी अकराच्या सुमारास शेळ्या चरायला घेऊन जात असताना उसाच्या शेतातून बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेळीला ठार केले. काही दिवसांपूर्वी घराच्या दारात कपडे धुत असताना निमगाव टेंभी (ता. संगमनेर) येथील संगीता वर्पे (वय ४२) या महिलेचा बिबट्याने बळी घेतला.

घारगाव, केळेवाडी परिसरातही बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे. मांजरी, कोपरे (ता. राहुरी) या भागात असणाऱ्या गावांमध्ये बिबट्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. अलिकडच्या वर्षभरात अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, पारनेर तालुक्यांतील अनेक गावांत बिबट्याचे हल्ले वाढले आहेत.

विशेषतः उसाचा पट्टा असलेल्या भागात दिवसा बिबटे मुक्तसंचार करत असून पशुंच्या गोठ्यांवर हल्ले करत आहेत. अलिकडे माणसांवरही हल्ले वाढल्याने लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकरी, नागरिक त्रस्त असताना वन विभागाकडून उपायोजना करण्याकडे, पिंजरे लावण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT