Micro-Irrigation Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

NABARD Subsidy Delay: शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मिळता मिळेना; दोन वर्षांपासून प्रतीक्षा!

Farmers’ Struggles: बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात ‘नॅशनल ॲडाप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज (NAFCC)’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे साहित्य वाटप करण्यात आले. मात्र, दोन-अडीच वर्षांपासून हे अनुदान मिळालेले नाही. २० लाखांहून अधिक रक्कम थकीत असून, शेतकरी अडचणीत आहेत.

 गोपाल हागे

Buldana News: ‘नाबार्ड’च्या नॅशनल ॲडाप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज (एनएएफसीसी) या योजनेअंतर्गत हवामान बदल अनुकूल प्रकल्प चालवले जातात. त्‍यातून जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात गेल्या काळात शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानित साहित्य वाटप करण्यात आले. मात्र, दोन ते अडीच वर्षांपासून या साहित्याचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

‘नाबार्ड’च्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी देऊळगावराजा तालुक्यात नॅशनल ॲडाप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज (एनएएफसीसी)योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. यासाठी शेतकरी निवड करून त्यांना रीतसर पूर्वसंमती देण्यात आली. यंत्रणेमार्फत मोका तपासणी झाली. साहित्य खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र अद्याप शेतकऱ्यांना छदामही मिळू शकलेला नाही. आपले अनुदान कधी येईल, कोण देईल या बाबत शेतकऱ्यांना कुठलीही माहिती मिळत नाही.

‘एनएएफसीसी’ योजनेतून कृषी, जलस्रोत आणि ग्रामीण विकास यासह विविध क्षेत्रांमध्ये हवामानातील लवचीकता आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाते. नाबार्ड या प्रकल्पांना पुनर्वित्त आणि इतर यंत्रणांद्वारे आर्थिक साहाय्य पुरवते. विविध उद्दिष्टांसह ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करीत ग्रामीण समुदायांसाठी लाभदायक ठरतील अशा प्रकल्पांना समर्थन दिले जाते. मात्र, योजना राबवल्यानंतर संबंधितांना अनुदान देण्यासाठी कुठलीही कार्यवाही अद्याप संबंधितांनी केली नाही. परिणामी लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान अडकले आहे.

सन २०२२-२३ मध्ये ठिबक व तुषार संच घेतला होता. सव्वा दोन एकरांत ठिबक केले व एक तुषार संच घेतला. माझी अनुदानाची रक्कम रखडली आहे. आमच्या भागात माझ्यासारखे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. आम्ही वारंवार स्थानिक अधिकाऱ्यांकडे याची विचारणा करीत आहोत, पण प्रस्ताव पाठवला आहे, असे सांगितले जाते.
नारायण साहेबराव सोसे, देऊळगावमही, जि. बुलडाणा
तालुक्यात ‘नाबार्ड’कडून ही योजना राबवली होती. त्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ‘नाबार्ड’कडे पाठपुरावा करीत आहोत. दरम्यान आयुक्तालयातून या ८२ शेतकऱ्यांचे २० लाख रुपयांचे अनुदान प्रचलित योजनेतून दिले जावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
भगवान कच्छवे, तालुका कृषी अधिकारी, देऊळगावराजा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey : ढोल-डफ वाजवित केले अधिकाऱ्यांचे स्वागत

Crop Loss Maharashtra : शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, पण सरकारला पाझर फुटेना

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ ः डॉ. नवले

Krushi Samruddhi Yojana : कृषी समृद्धीचा आराखडाच नाही

Dam Water Discharge : जायकवाडी धरणातून गोदावरीत सव्वादोन लाख क्युसेकने विसर्ग

SCROLL FOR NEXT