Shetkari Weight Bridge agrowon
ॲग्रो विशेष

Shetkar Weight Bridge : शेतकरी वजन काट्याचा प्रयोग आता मंगळवेढ्यातही

Andolan Ankush : आंदोलन अंकुशने उभारलेल्या शेतकरी वजन काट्याची पाहणी मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.

sandeep Shirguppe

Sugarcane Farmer : साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटामारी रोखण्यासाठी येथे आंदोलन अंकुशने उभारलेल्या शेतकरी वजन काट्याची पाहणी मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी वजन काटा उभा करण्याचा निर्धार मंगळवेढा येथून आलेल्या शेतकरी शिष्टमंडळाने केला.

येथील आंदोलन अंकुशने उभा केलेल्या शेतकरी वजन काट्याची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा त्रयस्थ काटा उभारण्यासाठी मंगळवेढ्यातील वीस शेतकरी आज येथे आले होते. त्यांनी आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजन काट्याची माहिती घेतली. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी त्यांना काट्याविषयी व या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल माहिती दिली. काटा उभारणीसाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, अशाच प्रकारचा प्रयोग येत्या हंगामात काटा उभा करणार असल्याचे या समितीचे प्रमुख संजय कट्टे यांनी जाहीर केले. आंदोलन अंकुशचे कृष्णा देशमुख, महेश जाधव, अमोल गावडे, एकनाथ माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, मंगळवेढ्यातील सजग नागरी कृती समितीचे ॲड. भारत पवार, शेतकरी संघटनेचे सिद्धेशवर हैम्बडे आदी शिष्टमंडळात सहभागी होते.

अशाच प्रकारचा प्रयोग आम्ही करणार...

उसाच्या वजनातील काटामारी वरील उत्तर म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काट्याचा प्रयोग आंदोलन अंकुश ने यशस्वी करून दाखवल्याने याची राज्यभर चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने या काट्याची माहिती करून घेण्यासाठी मंगळवेढ्याचे शिष्टमंडळ शेतकरी वजन काट्यावर भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी याची माहिती घेऊन अशाच प्रकारचा प्रयोग आम्ही येत्या हंगामात काटा उभा करून करणार असल्याचे या समितीचे प्रमुख संजय कट्टे सर यांनी यावेळी जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inflation Rate: महागाई दरघटीचा बळी शेतकरीच

Agriculture Inflation: भूलभुलय्या महागाई दराचा!

POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

Pune Cluster School : पुणे जिल्ह्यातील वाडा येथे दुसरी समूह शाळा

Crop Loan Distribution: साडेतीन लाख कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT