Cotton Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Agriculture Department : कृषी आयुक्तालयाने कपाशीच्या बियाण्यांची विक्री एक जूननंतरच करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : कृषी आयुक्तालयाने कपाशीच्या बियाण्यांची विक्री एक जूननंतरच करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. जिल्ह्यात बंदी असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कापूस उत्पादक शेतकरी तेलंगणा, आंध्र प्रदेशात जाऊन बियाण्यांची खरेदी करतात. याचा मोठा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांना बसत असून बोंड अळीचा धोका देखील वाढता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात धानानंतर कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. या वर्षी एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तसे नियोजनही विभागाने केले आहे. जिल्ह्यात राजुरा, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, वरोरा, भद्रावती आणि चिमूर परिसरात कपाशीची लागवड केली जाते.

सिंचनाची सुविधा असलेले अनेक शेतकरी मे महिना लागताच कपाशीची लागवड करतात. मॉन्सूनच्या आधीच कपाशीच्या बियाण्यांची लागवड केल्यास बोंड अळीचा धोका आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कपाशी बियाण्यांची विक्री एक जूननंतरच करण्याचे आदेश आहे. या आदेशाचा मोठा फटका कृषी केंद्र चालकांना बसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एक हजारांहून अधिक कृषी केंद्रे आहेत. त्यांना पुढील महिन्याच्या शेवटी शेवटी कपाशीची बियाणे मिळणार आहे. मात्र त्याआधीच सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी आंध्र प्रदेश, तेलंगणात जाऊन कपाशीचे बियाणे आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या अनधिकृत व्यवहारात शेतकरी सहभागी होत असल्याने त्यांच्यावर कारवाई कशी करावी, असा प्रश्‍न कृषी विभागासमोर निर्माण होतो. त्यामुळे दरवर्षी मॉन्सूनपूर्व लागवड क्षेत्र वाढतेच आहे. यंदाच्या हंगामात कृषी विभाग यासंदर्भाने काय कारवाई करतो ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एचटीबीटीची लागवड

चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतच मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे तणाला प्रतिकारक, अर्थात एचटीबीटीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होते. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा आंध्र प्रदेश व तेलंगणाशी जुळलेल्या आहेत. त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांचा वापर करीत हे काम होते.

पाऊस पडल्यानंतरच कपाशीच्या बियाण्यांची लागवड शेतकऱ्यांनी करावी. त्याआधी लागवड केल्यास बोंड अळीचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगर्दीत कपाशीच्या बियाण्यांची लागवड करणे टाळावे.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT