Cotton Seed : जळगावात २७ लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी

Seed Demand : जिल्ह्यात पाच लाख ५७ हजार हेक्टरवर कापूस लागवड होऊ शकते. त्यासाठी २७ लाख कापूस बियाणे पाकिटांची गरज असणार आहे.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

Jalgaon News : जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टर एवढी कापूस लागवड होईल. त्यासाठी सुमारे २७ लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी असणार आहे, अशी माहिती खरीप आढावा बैठकीत कृषी यंत्रणांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते.

Cotton Seed
Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

खते व बियाणे मुबलक व वेळेत उपलब्ध व्हायला हवे. खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे. रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर कसा कमी होईल, यासाठी प्रयत्न करावेत. जैविक खते, कीडनाशके यांचा वापर वाढायला हवा. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या.

जिल्ह्यात पाच लाख ५७ हजार हेक्टरवर कापूस लागवड होऊ शकते. त्यासाठी २७ लाख कापूस बियाणे पाकिटांची गरज असणार आहे. जिल्ह्यात एकूण सात लाख ४४ हजार हेक्टरवर खरीप पिके असतील.

Cotton Seed
Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

त्यात कापसाची अधिक लागवड होईल. त्यानंतर तृणधान्ये, कडधान्य पिके असतील. एकूण १८ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. तर तीन लाख २३ हजार टन रासायनिक खतांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. ७३ हजार २०० एवढ्या नॅनो युरियाच्या बाटल्या जिल्ह्यास मिळतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, खतांची गुणवत्ता व पुरवठा याबाबत तपासणीसाठी १८ भरारी पथके नियुक्त केली आहेत. फळबाग योजनांतून फळ पिकांची लागवड झाल्याची माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com