Cashew Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Rate : काजू बी दरावरून उत्पादक आक्रमक

Cashew Market : काजू बीच्या हमीभावाबाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे संतप्त झालेल्या काजू उत्पादकांनी रविवारी (ता.१०) रास्ता रोको आंदोलन केले.

एकनाथ पवार

Sindhudurg News : काजू बीच्या हमीभावाबाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे संतप्त झालेल्या काजू उत्पादकांनी रविवारी (ता.१०) रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान उत्पादकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सिंधुदुर्गातील काजू बी दराचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सध्या काजू बी ला प्रतिकिलो ११५ ते १२० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे काजू उत्पादक हैराण झालेले असून विविध संघटनांनी शासनाकडे काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी केलेली होती. अधिवेशनात निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता.

परंतु काजू उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त झालेल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील उत्पादकांनी दोडामार्ग येथील गणेशमंदिर ते बाजारपेठेतील मुख्य चौकापर्यंत मोर्चा काढला. या वेळी ‘शेतकरी फळबागायतदार संघाचा विजय असो’, ‘काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे’, अशा घोषणात देत दोडामार्ग येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

शेकडो काजू उत्पादकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. संतप्त झालेले काजू उत्पादक (Cashew Production) जोरजोरात घोषणाबाजी करीत होते. आठवडाबाजाराच्या दिवशी आंदोलन केल्याने वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली.

तिलारी, गोवा, सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः थांबली होती. या वेळी शासनाकडून येत्या दोन दिवसांत काजू बी हमीभावाबाबत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात अध्यक्ष विलास सावंत, दिलीप मावळणकर यांच्यासह शेकडो काजू उत्पादक सहभागी झाले होते.

आता मुंबई-गोवा महामार्ग रोखणार

काजू बी दराबाबात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. आता दोडामार्गात रास्ता रोको आंदोलन केले. परंतु जर दोन-तीन दिवसांत निर्णय न झाल्यास तर मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा काजू उत्पादकांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT