Farmers Crop Sowing agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Crop Sowing : शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधला, पेरण्यांची लगबग वाढली

sandeep Shirguppe

Kolhapur Crop Sowing : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण राहिल्याने मॉन्सूनचा पाऊस लवकरच येणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. दरम्यान शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या लगबगीकडे लागला आहे. जिल्ह्यातला शेतकरी पारंपारिक पद्धतीसह आधुनिक तंत्राच्या सहायाने पेरणी करत रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधला. विशेषतः कागल, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात पेरण्यांनी सर्वाधिक गती घेतली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शेतात आणि शेतकरी कुटुंबात खरिपाच्या पेरण्यांची जोरदार तयार सुरू आहे. आज रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. या नक्षत्रानुसार जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, याच मुहूर्तावर बळीराजाने पेरणीसाठी कुऱ्या हातात घेतल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ९० हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. चांगले आणि दर्जेदार बियाणांची निवड करून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात ३७ हजार ७७१ क्विंटल बियाणांची पेरणी केली जाणार आहे. यामध्ये भात, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका, नाचणी, सोयाबीसह इतर कडधान्यांचा समावेश आहे. या सर्व बियाणांची खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावरही शेतकऱ्यांकडून गर्दी केली जात आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ठिक-ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मात्र ऊस आणि पेरणीच्या शेतीसाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करतात. तर, हातकणंगले तालुक्यात अद्याप शेतीच्या मशागतीची अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत.

ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे किंवा स्वतःचे पाणी देता येते, अशा ठिकाणी पेरणीची धांदल उडाली आहे. दरम्यान, आज ज्या शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

'जिल्ह्यात पावसाचे वातावरण चांगले वाटत आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतालाही चांगली घात आहे. त्यामुळे रोहिणी नक्षत्रावर पेरणी करण्याचा यंदा चांगला योग आला आहे.

यशवंत पाटील, शेतकरी, बामणी (ता. कागल)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT