Pune News: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार होत आहे. १५ सप्टेंबरपासून मॉन्सून पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा संपूर्ण देशात नऊ दिवस आधीच दाखल झालेला मॉन्सून परतीच्या निघण्याचे संकेतही दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आधीच आहेत. .वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे, आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे आवश्यक असते. .Monsoon Update: शुक्रवार आणि शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज.वेळेपूर्वीच परतण्याचे संकेतयापूर्वी १ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख होती. हवामान विभागाने २०२० मध्ये मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या प्रवासाचे दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रक जारी केले..त्यानुसार मॉन्सूनच्या परतीची लांबणारी वाटचाल लक्षात घेता, १७ सप्टेंबर ही तारीख राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची निश्चित करण्यात आली. मात्र यंदा दोन दिवस आधीच १५ सप्टेंबरपासून मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते..Maharashtra Monsoon Update: घाटमाथा, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पावसाचा अंदाज.या वर्षी विक्रमी वेगाने आगमन करत २४ मे रोजी केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल मॉन्सून झाला. मॉन्सूनने २५ मे रोजी तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिली. १९९० नंतर प्रथमच मॉन्सून इतक्या लवकर महाराष्ट्रात धडकला..२६ मे रोजी मुंबईसह पुणे, धाराशिवपर्यंत मॉन्सून पोहोचला होता. तर २८ मे रोजी मॉन्सूनने पुढे चाल करत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आणखी काही भागासह विदर्भात प्रगती केली होती. त्यानंतर मॉन्सूनची थबकलेली वाटचाल तब्बल तीन आठवड्यानंतर १६ जून रोजी सुरू झाली. .साधारणतः १५ जूनपर्यंत राज्य व्यापणारा मॉन्सून यंदा १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला होता. मॉन्सूनने मजल दरमजल पुढील प्रवास सुरू ठेवत अवघ्या १२ दिवसांत मॉन्सूनने उर्वरित देशात मजल मारली. २९ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.