Farmer Motivational Campaign Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Welfare : आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी प्रेरणा अभियान

Farmer Motivational Campaign : जमिनीचा वाद असेल..बांधाचा वाद असेल अथवा शेती करूनही हाती काहीच न येणं यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो.

Team Agrowon

Solapur News : जमिनीचा वाद असेल..बांधाचा वाद असेल अथवा शेती करूनही हाती काहीच न येणं यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने ‘शेतकरी प्रेरणा अभियान’ सुरू करणार असल्याचे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर आयोजित कृषी-औद्योगिक राज्यस्तरीय प्रदर्शनाचा समारोप बुधवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी,

उद्योजक शरद ठाकरे, कृषी प्रदर्शन समितीचे चेअरमन गुरुराज माळगे, आत्माचे निवृत्त प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, सिद्धेश्वर बमणी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते आदी उपस्थित होते.

आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती व शहरातील किचन गार्डनसाठी मार्गदर्शक ठरणारी दालने तसेच शेतात मजुरांची कमतरता भासते. त्यावर प्रभावी उपाय म्हणून अवघ्या सात मिनिटात एक एकर पिकांवर फवारणी करणारे ड्रोन यंत्राचे प्रात्यक्षिक,

जगातील बुटकी म्हैस, गाय, चायनाचा बोकड अन् कोंबडी आदी नावीन्यपूर्ण माहिती देणाऱ्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाला शहर व जिल्ह्यातील ५२ हजार नागरिकांनी भेट दिल्याची माहिती गुरुराज माळगे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT