Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers protest : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी ३ ऑक्टोबरला देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन

Farmers protest on Punjab Railway tracks : किसान मजदूर संघर्ष समितीने शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून अखेर रेल्वे रोको आंदोलन पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ऑक्टोबर रोजी दोन तास रेल्वे रोको आंदोलन केले जाणार असून याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसण्याची शक्यता.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या सहा ते सात महिन्यापासून हरियाणाच्या शंभू आणि पंजाबच्या खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. तर आता याच मागणीसाठी देशव्यापी रेल्वे रोको आंदोलनाची केले जाणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी दोन तास रेल्वे रोको आंदोलन जाईल, अशी माहिती किसान मजदूर संघर्ष समितीचे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी (ता.१) दिली.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. याबाबत पंढेर यांनी माहिती देताना सांगितले की, शंभू सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या बळकटीसाठी ३ ऑक्टोबर रोजी देशभरात २ तास रेल्वे रोको आंदोलन केले जाईल. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत रेल्वे रोको केला जाईल.

रेल्वे रोको आंदोलन पंजाब मधील २२ जिल्ह्यांमध्ये केले जाणार असून ते पंजाब व्यतिरिक्त इतर ठिकाणी देखील होणार आहे. रेल्वे ट्रॅकवर दोन तास शेतकरी आंदोलन करतील. यामुळे रेल्वे सेवेवर काहीसा परिणाम होऊ शकतो. यावेळी प्रवाशांनी थोडा शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करावा, असेही पंढेर यांनी म्हटले आहे.

तसेच फगवाडा कारखान्याने २०२१-२२ च्या हंगामापर्यंत शेतकऱ्यांचे २८ कोटी रुपये थकवले आहेत. कायदेशीररित्या ही रक्कम १४ दिवसांच्या आत द्यायची असते. पण ती अद्यापही मिळालेली नाही. यामुळे ती रक्कम आता व्याजासह लवकरात लवकर फगवाडा कारखान्याने द्यावी. तसेच सरकारने उसाच्या भावातही वाढ करावी, अशी मागणी यावेळी पंढेर यांनी केली आहे.

योग्य भावात डीएपी

याचबरोबर आमचे धान पीक येथील मार्केटमध्ये पडून आहे. ते खराब होत आहे. सरकारने धान उचलण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करून धानाची उचल करावी. रब्बी पिकांच्या पेरणी जवळ आली असून डीएपीचा काळाबाजार सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. तरी डीएपी खताच्या टॅगिंगकडे सरकारने लक्ष देऊन डीएपी खत शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशीही मागणी शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT