Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : शेतकरी नेते जगजीतसिंह डल्लेवाल यांची प्रकृती खालावली; २५ व्या दिवशीही उपोषण सुरूच

Farmers Struggle : डल्लेवाल गुरुवारी (ता.१९) आंघोळ करताना बेशुद्ध पडले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर डल्लेवाल यांना शुद्ध आली. परंतु त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.

Dhananjay Sanap

Protest Against Government : संयुक्त किसान मोर्चा अरायजकीयचे नेते जगजीतसिंह डल्लेवाल यांची प्रकृती आमरण उपोषणा २५ दिवशी खालावली आहे. त्यांनी उपचार घेतला नाही तर त्यांच्या हृदयाचे ठोके कधीही बंद पडू शकतात. तसेच त्यांची किडनी काम करण्याचे थांबवू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डल्लेवाल गुरुवारी (ता.१९) आंघोळ करताना बेशुद्ध पडले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर डल्लेवाल यांना शुद्ध आली. परंतु त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.

हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर सरकार तोडगा काढत नाही. त्यामुळे डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी(ता.२०) त्यांचा उपोषणाचा २५ दिवस आहे. सरकारने शेतकऱ्यांछाया मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण माघार घेणार नाही, अशी भूमिका डल्लेवाल यांनी घेतलेली आहे.

गुरुवारी डल्लेवाल यांचा रक्तदाब कमी झाला होता. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी राजिंद्र हॉस्पिटल, पटियाला येथील वैद्यकीय पथक पोहचले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकरी आंदोलन स्थळाजवळ हॉटेल रूमचे मीनी हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मी आपल्या प्राणाची आहुती देण्यास मानसिकदृष्ट्या तयार असल्याचे डल्लेवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून इशारा दिला आहे. तसेच त्यांनी, प्रत्येक शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत देणे हा जगण्याच्या मूलभूत अधिकाराप्रमाणे आहे. शेतकऱ्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्याचा निर्णय घेतला असून माझ्या मृत्यूनंतर केंद्र सरकार झोपेतून जागे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर हमीभाव कायद्यासह विविध १३ मागण्याही केंद्र सरकार पूर्ण करण्यासाठी काम करेल, अशी डल्लेवाल यांनी भूमिका घेतलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT