Pune News : देशाच्या कृषी क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी माजी पंतप्रधान राहिलेल्या चौधरी चरणसिंह, पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासह कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कारने सन्मामित करण्यात आले आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.
पोस्ट करताना मोदी म्हणाले की, ''देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंहजी यांनी भारतरत्न देवून सन्मानित केले जात आहे हे आमच्या सरकराचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलवनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असोत की देशाचे गृहमंत्री असो, एवढंच काय तर आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणिबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले.
आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी आहे.'' अशा शब्दात मोदी यांनी चरणसिंह यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोण होते चौधरी चरणसिंह?
देशात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे नेते अशी चौधरी चरणसिंह यांची ओळख आहे. देशात शेतकऱ्यांचा आवाज उठवणारे अनेक नेते झाले. पण देशाचे पंतप्रधानपद भूषवलेल्या चौधरी चरणसिंह यांना शेतकरी खऱ्या अर्थाने आपला कैवारी मानतात.
१९७९ ते १९८० दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले. पंतप्रधानपदाच्या आपल्या छोट्या कार्यकाळात त्यांनी शेती क्षेत्रातील सुधारणांच्या धोरणांमध्ये मोठे योगदान दिले. त्यामुळे चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.
शेतकऱ्यांचे कैवारी अशी ओळख
देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या अल्प कार्यकाळामध्ये चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या अत्याचारापासून दिलासा देण्यासाठी १९३९ मध्ये कर्जमुक्ती विधेयकाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशातील पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी आणि वनमंत्री म्हणूनही काम पाहिले.
राष्ट्रीय शेतकरी दिन
चौधरी चरणसिंह यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले होते. मात्र, असे असले तरी आजही त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते. आणि म्हणूनच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
देशातील शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी चौधरी चरणसिंह यांनी विशेष प्रयत्न केले. परिणामी, २००१ साली तत्कालीन सरकारने चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.