Anil Ghanwat Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Indebtedness : सरकारी धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी

Government Policy : शेतकरी व देशाचे दारिद्र्य हटविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी येथे गुरुवारी (ता. ७) व्यक्त केले.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले आहेत.कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही.शेतकरी व देशाचे दारिद्र्य हटविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी येथे गुरुवारी (ता. ७) व्यक्त केले.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे येथील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या, आंदोलनाची तयारी व पक्ष बांधणीवर चर्चा करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे, शेतकरी संघटनेचे विभाग प्रमुख शशिकांत भदाणे यांनी मार्गदर्शन केले.

देश व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली आहे. कोणत्याही पक्षाला विचारधारा राहिलेली नाही. सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे व गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे. भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला असून, सर्व नागरिक परेशान आहेत. एकही पक्ष कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करू शकत नाही.

देशात कायद्याचे राज्य पुर्नस्थापित करण्यासाठी शरद जोशींनी निर्माण केलेला स्वतंत्र भारत पक्ष बळकट करणे गरजेचे आहे. संपूर्ण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, सुरळीत वीजपुरवठा व कर्जमुक्तीसाठी जानेवारीत राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब धुमाळ व जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण आहिरे यांची नियुक्ती करण्यात आली.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाणे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर ढिकले, माजी अध्यक्षा निर्मलाताई जगझाप, माजी विभागप्रमुख संतू पाटील झांबरे, संध्या पगारे, उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, रामकृष्ण बोंबले, केशव सूर्यवंशी, प्रवीण आहिरे, नयन सोनवणे,

बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब शेवळे, रामनाथ ढिकले, बाळासाहेब धुमाळ, किसान शिंदे, संतू पाटील-बोराडे, कचरू बागूल, सुभाष गवळी, अण्णा घुमरे, अरुण जाधव, बाळासाहेब गायकवाड, जफरभाई पठाण, यशवंत आथरे, नवनाथ कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT