कृषी तंत्रज्ञान प्रसारामुळे पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने प्रक्रिया उद्योगांना (process industries) देखील गावपातळीवर चांगली गती मिळाली आहे. असाच काहीसा प्रयत्न डॉ. विद्या मानकर यांनी केला. वर्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी डॉ. विद्या मानकर यांची १३ जून २०१८ रोजी नियुक्ती झाली.
मात्र अवघ्या एका वर्षातच २९ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांची नियुक्ती प्रकल्प संचालक ‘आत्मा’ या पदावर झाली. दरम्यानच्या काळात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा प्रभार पुन्हा जुलै २०२२ पासून डॉ. मानकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी जिल्ह्यात विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीला चांगली गती दिली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
जागृती अभियानावर भर
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी अनेक घटकांची एकत्रित फवारणी करत होते. त्यामुळे विषबाधा होत होत्या. हे लक्षात घेऊन त्यांनी कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने योग्य पद्धतीने फवारणीबाबत जागृती अभियान राबविले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिनींग, प्रेसिंग व्यावसायिकांमध्ये जागृती करण्यात आली. अतिरिक्त किंवा कमी पाण्यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बीबीएफ यंत्राव्दारे लागवडीला प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला आहे.
शेतकरी कंपन्यांना बळकटी
वर्धा जिल्ह्यामध्ये सत्तरपेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. स्मार्ट तसेच पोकरा प्रकल्पातून उद्योगाची उभारणी झाल्याने शेतीमालाचे मुल्यवर्धन व रोजगार निर्मिती झाली आहे. जिल्ह्यातील १६ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर केले आहेत.
त्यापैकी तेरा प्रस्तावांना प्राथमिक मान्यता मिळाली आहे. पोकरा प्रकल्पातून महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ४० प्रकल्पांना चार कोटी रुपयांचा लाभ मिळाला. आतापर्यंत ८४ प्रकल्पांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यापैकी ६२ प्रकल्प अवजार बँकेबाबत आहेत.
नऊ गोदाम प्रकल्प, दोन डाळ मिल, तीन प्रक्रिया युनिट, तीन तेल प्रक्रिया युनिट आणि पाच प्रकल्प शेतीमाल विक्रीसाठी वाहनांविषयी आहेत.
‘पोकरा’ प्रकल्पातून विविध प्रकल्पांना चालना
१) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २,६८८ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचाची उपलब्धता. ४ कोटी ७६ लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ.
२) जिल्ह्यातील १२५ गावांमध्ये शेतीशाळेचे आयोजन. रुंद वरंबा सरी, शून्य मशागत इत्यादी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन.
३) वैयक्तिक लाभांतर्गत ठिबक, तुषार, पॉलिहाउस, शेततळे, वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, शेततळे, फळबाग, विहीर पुनर्भरण, नाडेफ खत टाकी, शेडनेट, बीजोत्पादन अशा वैयक्तिक योजनांवर साठ ते शंभर टक्क्यांपर्यंत अनुदान.
४) १२५ गावांमध्ये प्रकल्पांतर्गत ४,९३२ शेतकऱ्यांना १२ कोटी रुपयांचा लाभ.
५) तुषार सिंचनासाठी २,६८८ शेतकऱ्यांना ४ कोटी ७६ लाख इतका वैयक्तिक लाभ.
६) शेतीमाल मूल्य साखळी बळकटीकरणांतर्गत ४४ शेतकरी महिला बचत गट, उत्पादक कंपन्यांना ४ कोटींचा लाभ.
७) प्रकल्पातील गावांमध्ये मृद् व जलसंधारण घटकांतर्गत ५ कोटी ६४ लाखांचा लाभ.
८) जिल्ह्यात स्ट्रॉबेरी, तेलबिया पिकांच्या करारशेतीकडे शेतकऱ्यांना कल. हिंगणघाट तालुक्यात कापूस प्रक्रियेसाठी जिनिंग व प्रक्रिया उद्योग, तूर प्रक्रिया उद्योगांची उभारणी.
संपर्क : डॉ. विद्या मानकर, ७५८८५३९७०६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.