Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Agriculture Tool Subsidy Online Application: शेतीसाठी यंत्र खरेदी करताना खर्च मोठा असतो, मात्र आता सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५०% अनुदान मिळू शकते. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सोपी असून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येतो.
MahaDBT
MahaDBTAgrowon
Published on
Updated on

Pune News: सरकारने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, अवजारे आणि प्रक्रिया यंत्रसामग्री खरेदीसाठी ५०% पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे शेती अधिक आधुनिक, सोपी आणि फायदेशीर होणार आहे.

योजनेच्या अर्जासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वर नोंदणी करुन योजनेचा लाभ घेता येतो. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

MahaDBT
Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

अर्ज प्रक्रिया

  • शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी नोंदणी’ करावी.

  • नोंदणी करताना नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचे तपशील भरावेत.

  • यानंतर शेतीचा तपशील (गाव, तालुका, ७/१२ उतारा) व यंत्रसामग्रीची निवड करावी.

  • निवडलेल्या यंत्रासाठीचे अधिकृत कोटेशन अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करताना पुढील कागदपत्रे अपलोड करावीत

  • आधार कार्ड

  • बँक पासबुक

  • शेतकरी ओळख प्रमाणपत्र

  • सर्व माहिती भरल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा.

MahaDBT
Agriculture Scheme : शेतीपूरक विविध योजनांचा लाभ घ्या

अनुदान मंजुरी व नियम

  • अर्ज सबमिट केल्यानंतर Application ID मिळतो, ज्याद्वारे अर्ज स्थिती तपासता येते.

  • अर्ज तालुका कृषी अधिकारीमार्फत पडताळणीसाठी पाठवला जातो.

  • यानंतर अर्जाची स्थिती वेळोवेळी संकेतस्थळावर लॉगिन करून पाहता येते.

  • राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे महाडीबीटीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे.

  • महाडीबीटीच्या योजनांसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य ही पद्धत लागु केली.

अर्ज रखडले

राज्यात महाडीबीटी योजनेंतर्गत विविध शेतकरी अर्ज करतात. परंतू अर्जाची सोडत वेळोवेळी केली जात नाही. त्यामुळे अर्ज रखडले आहे. राज्यात कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी ४५ लाख अर्ज निधी अभावी अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज करुनही ते प्रतिक्षेत आहेत.

अधिक माहिती व मदत

ही योजना शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी मदत करणारी ठरणार आहे. त्यामुळे वेळेत अर्ज करा, अर्जाची स्थिती तपासा आणि मंजुरी मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करून योजनेचा फायदा घ्या. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com