Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road : अमळनेर मतदारसंघात ५० गावांत होणार शेतरस्ते

Agriculture Farm Road Issue : विशेष म्हणजे, भारताला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मतदारसंघात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतशिवार रस्ते होत आहेत. त्यामुळे शेतात येण्याजाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांसाठी भरभरून नियोजन केल्याचे दिसत असून, गेल्या आठवड्यात तालुक्यासाठी दुष्काळी योजना तसेच नुकसान भरपाईची भेट शेतकऱ्यांना दिली असताना आता पुन्हा अमळनेर मतदारसंघातील ५० गावांना शेतशिवार रस्त्यांना मंजुरी देऊन मोठे गिफ्ट शेतकरी बांधवांना दिले. सुमारे १० कोटी निधीतून हे शेतरस्ते होणार आहेत.

विशेष म्हणजे, भारताला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मतदारसंघात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतशिवार रस्ते होत आहेत. त्यामुळे शेतात येण्याजाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून हे रस्ते होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील तब्बल ५० गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर उर्वरित गावांनाही अशाच पद्धतीने शेतरस्ते मंजूर केले जाणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. दहा कोटी निधीतून ५० गावांतील रस्त्यांची कामे होणार आहेत. हे रस्ते तयार झाल्यानंतर ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

या मंजुरीबद्दल अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर शेतीसाठी आवश्‍यक असलेला रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांनीही अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

खालील गावांचा आहे समावेश

या दहा कोटी निधीतून खालील ५० गावांमध्ये गावाकडून शेताकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण होणार असून, यासाठी प्रत्येक गावात २० लाख रुपये खर्च होणार आहेत. यात हिंगोणे खुर्द प्र.ज., जानवे, पातोंडा, शिरूड, गांधली, वावडे, हेडावे, चौबारी, मांडळ, कळंबू, तामसवाडी, अंतुर्ली, आमोदे, तासखेडा, निंभोरा, जळोद, नगाव खुर्द, गडखांब, कंडारी, खेडी, टाकरखेडा, तरवाडे, खेडी प्र'.ज, बोदर्ड, पळासदडे, पिंपळकोठा, जिराळी, इंधवे, रत्नापिंप्री, भोलाणे, वंजारी, दगडी सबगव्हाण, नगाव बुद्रुक, निंब, रामेश्‍वर, वाघोदे, फाफोरे, सारबेटे, कुऱ्हे बुद्रुक, आर्डी, अमळगाव, वसंतनगर, हिंगोणे खुर्द प्र.अ., चिखलोद खुर्द, गलवाडे बुद्रुक, सावखेडा, निमझरी, नालखेडा, मंगरूळ, दापोरी आदी गावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT