Farm Road : चंद्रपूर जिल्ह्यात पाणंद रस्ते घेणार मोकळा श्‍वास

Panand Road Issue : ‘बळीराजा समृद्धी शेत रस्ते मोहिमे’अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार किलोमीटरचे पाणंद-शेतशिवार रस्तेनिर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.
Panand Road
Panand RoadAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : ‘बळीराजा समृद्धी शेत रस्ते मोहिमे’अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार किलोमीटरचे पाणंद-शेतशिवार रस्तेनिर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी धडक मोहीम हाती घेतली असून, कार्यवाहीस प्रारंभही झाला आहे.

पाणंद रस्ते समृद्ध शेतीकरिता महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, जागेच्या वादावरून अनेक ठिकाणी पाणंद रस्ते होऊ शकत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसतो.

परिणामी, त्याचा शेतपिकावरही परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार किलोमीटरचे पाणंद रस्ते तयार करण्याचा ‘मेगा प्लॅन’ हाती घेतला आहे. या योजनेच्या प्रशासकीय कामाला सुरवात झाली आहे.

Panand Road
Farm Road Issue : शेतरस्ते, पांदण रस्त्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी संबंधित विभागाची नुकतीच बैठक घेतली. यात पाणंद रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. ‘बळीराजा समृद्धी शेत रस्ते मोहीम’ या नावाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, जिल्ह्यातील सर्व सरंपच व सर्व पोलिस पाटील यांना या प्रकल्पाकरिता तप्तरतेने कार्य करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अन्‌ कुठल्याही परिस्थितीत पाणंद रस्ते निर्माण उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Panand Road
Farm Road Issue : नायब तहसीलदारांची थेट शेतीच्या बांधावर सुनावणी

असे होणार फायदे...

शेतकरी कृषी निविष्ठा बी-बियाणे शेतापर्यंत सहजरित्या नेऊ शकतील, शेतकऱ्यांना योग्य वाटेल ते पीक पालटू शकतील, रस्त्याच्या उपलब्धतेमुळे नगदी पीक घेतले जाईल. दळणवळणाच्या साधनांमुळे रेलचेल वाढेल व बाजारपेठ जवळ करता येईल, आपल्या शेतीवर प्रत्येक वेळी नजर ठेवता येईल. याशिवाय जमिनीच्या किमती सुधारण्यास वाव मिळेल.

अशी होणार अंमलबजावणी

  •  पाणंद रस्त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर ठराव घेतले जाणार

  •  ठराव तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार.  मंजुरीनंतर बांधकाम विभागाकडून त्याचे इस्टिमेट तयार होणार

  •  प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात कामाला सुरवात होईल

  •  जर कुणी रस्त्याला मंजुरी देत नसेल, तर गाव तंटामुक्त समिती यावर निर्णय देईल

  •  तिथेही प्रश्न सुटला नाही, तर पोलिस व महसूल विभाग संयुक्तरित्या हे प्रकरण हाताळतील

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशानुसार पाणंद रस्ते तयार करण्याच्या उपक्रमाबाबत बैठका घेण्याचे काम सुरू झाले आहे. शेती व शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.
- बालाजी शेवाडे, उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com