Soybean Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farming: सोयाबीन उत्पादनवाढीसाठी इंदूरमध्ये मोठी बैठक; शेतकरी-शास्त्रज्ञ संवादावर भर

Farmer First: शेतीचं संशोधन दिल्लीच्या बोर्डरूम मध्ये नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतात आणि त्यांच्या अनुभवांमधून ठरायला हवं. संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं, तरच त्याचा खरा फायदा होईल. शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दरी कमी करणं गरजेचं आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.

Sainath Jadhav

Pune News: शेतीचं संशोधन दिल्लीच्या बोर्डरूम मध्ये नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतात आणि त्यांच्या अनुभवांमधून ठरायला हवं. संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं, तरच त्याचा खरा फायदा होईल. शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दरी कमी करणं गरजेचं आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.

इंदूरमधील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेत (NSRI) शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बैठक झाली.या बैठकीत महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हेही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. सोयाबीनच्या उत्पादनात वाढ, त्याची गुणवत्ता सुधारणे आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणे यावर दोघांची सविस्तर चर्चा झाली.

संशोधक आणि शेतकरी यांच्या परस्पर संबंधावर चर्चाही या बैठकीत झाली. ‘विकसित कृषी संकल्प अभियाना’ अंतर्गत कोइम्बतुर मधील कापूस उत्पादक, मेरठ मधील ऊस उत्पादक आणि कानपूर मधील डाळ उत्पादक इत्यादी शेतकऱ्यांशी संवाद साधला असही त्यांनी सांगितलं.

भारतात १६,००० शास्त्रज्ञ असून, ते उच्च दर्जाची बियाणे आणि नाविन्यपूर्ण संशोधन करत असल्याचं सांगितलं. पण, त्यांचं काम बऱ्याचदा शेतकऱ्यांपासून दूर राहून चालत.शेतकऱ्यांशी किंवा शेत-बांध्याशी त्यांच्या थेट संबध येत नाही, असही ते म्हणतात. शेतकरी आणि संशोधक या दोघांमधील परस्परबंधाचे महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले कि, जर शेतीचा विकास जलद गतीने करायचा असेल तर शेतकरी-संशोधक संबध अधिक दृढ व्हावेत.

संशोधकांचे काम शेतीच्या बांधावर पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. “आतापर्यंत शास्त्रज्ञ ठरवायचे की काय संशोधन करायचं. आता शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संशोधनाची दिशा ठरेल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पुढे ते म्हणतात कि, काही प्रगतशील सोयाबीन शेतकऱ्यांनी एका एकरात २० क्विंटल उत्पादन घेतल्याचं सांगितलं.

“अशा शेतकऱ्यांचे अनुभव आणि यश सगळ्यांनाच प्रेरणा देतील. त्यांच्याकडून शिकून संशोधनाला गती द्यावी लागेल,” असं चौहान म्हणाले.येत्या काळात कॉटन, ऊस, डाळी यांसारख्या प्रमुख पिकांवरही अशा बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या गरजांनुसार संशोधनाला दिशा देऊन त्यांना अधिक नफा आणि सक्षमता मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT