Sugarcane Registration: ‘लकी ड्रॉ’ने होणार ऊस लागवडीची नोंद

Lucky Draw Method: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ऊस लागवड नोंदणी प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी बदल करत यंदा १ जुलै आणि १६ जुलै रोजी ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी कमी करणे व पारदर्शक प्रक्रिया ठेवणे हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.
Chhatrapati Sugar Factory
Chhatrapati Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Walchandnagar News: भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस लागणीच्या नोंदीच्या धोरणामध्ये बदल केला असून एक जुलै व १६ जुलै रोजी लागवड केलेल्या उसाची नोंद लकी ड्रॉ (सोडत) पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२५-२०२६ चे ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. १ जुलै २०२५ पासून ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लागण नोंद देण्यासाठी सभासदांची नेहमीच गर्दी होते. सभासदांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच गर्दी कमी करण्यासाठी चालू वर्षीपासून ऊस लागवड घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे.

Chhatrapati Sugar Factory
Malegaon Sugar Factory : माळेगावच्या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ची चर्चा

ऊस लागण नोंद घेण्याच्या नवीन पद्धतीनुसार एक जुलै रोजी को-एम ०२६५ व १६ जुलै रोजी को- ८६०३२ व पी. डी.एन. १५०१२ या जातीच्या उसाची लागवड नोंदणी अर्ज त्या दिवशी सकाळी सात ते १० वाजेपर्यंत गाव व विभागानुसार घेण्यात येणार आहेत.

Chhatrapati Sugar Factory
Ajinkyatara Sugar Mill: अजिंक्यतारा कारखान्याला ‘भारतीय शुगर्स’चा पुरस्कार

तसेच त्याच ठिकाणी सकाळी ११ वाजता लागण नोंदणी फॉर्मची सोडत काढण्यात येणार असून, सोडतीप्रमाणे उसाची तोडणी होणार आहे.

ऊसक्षेत्राची यादी पाच जुलैला लावणार

रद्द केलेल्या व लागवड होऊन कायम केलेल्या ऊस क्षेत्राची सभासदनिहाय को- ०२६५ जातीच्या उसाची लागण नोंदीची यादी पाच जुलैला, तर को- ८६०३२ या व्हरायटीची व पी.डी. एन. १५०१२ या व्हरायटीची लागण नोंदीची यादी २० जुलै रोजी ग्रामपंचायत व सोसायटी कार्यालयास लावण्यात येणार आहे. एक जुलै व १५ जुलै या दोन लागण तारखा वगळता इतर लागण नोंदी पूर्वप्रमाणेच घेतल्या जाणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com