Farm Pond Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond Subsidy : अनुदानामुळे शेततळ्यांना शेतकऱ्यांकडून पसंती

Agriculture Department : शेतीकडे पाठ करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत शेततळी खोदून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे अनेक शेतकरी पसंत करीत आहेत.

Team Agrowon

Pen News : रायगड जिल्ह्यात एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील अनेक शेतकरी आता शेततळ्यांकडे वळले आहेत. भातशेती करताना उत्पन्नापेक्षा खर्च आणि मेहनत अधिक होत असल्‍याने शेतकरी अन्य उद्योग-व्यवसायाकडे वळत आहेत.

उधाणाचे पाणी शिरल्‍याने अनेक ठिकाणची शेती पडीक आहेत. तर, काहींनी उत्‍पन्नवाढीसाठी शेतीला पूरक व्यवसाय सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून खारेपाटात शेतीबरोबरच मासेमारी व्यवसाय केला जातो. वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्‍मानी संकट ओढावले आहे.

मेहनत करून केलेली भातशेती वाया जात आहे. मशागत, पेरणी, लावणी, कापणी, झोडणी करून पिकवलेला भात घरात वा बाजारपेठेत नेईपर्यंत हजारो रुपये खर्च होतात; मात्र त्‍याला योग्‍य हमीभाव मिळत नसल्‍याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.

तर, काही वेळा परतीचा पाऊस, वादळ, हवामान बदलाचा फटका सहन करावा लागतो. त्‍यामुळे शेतीकडे पाठ करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत शेततळी खोदून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे अनेक शेतकरी पसंत करीत आहेत. तीन वर्षांत पेणमधील लागवडीखालील क्षेत्र २०० ते ३०० हेक्टरने कमी झाले आहे.

कृषी विभागाकडून शेततळे खोदण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत वेगवेगळ्या मॉडेलसाठी २९ हजार ते ७५ हजारांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. खारेपाट विभागासाठी दोन मीटर खोलीच्या शेततळ्यासाठीदेखील सरकारने विशेष परवानगी दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा.
- सागर वारकर, कृषी अधिकारी, पेण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT