Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Survey : पीकविम्याच्या सर्वेक्षण अर्जांवर खोट्या सह्या

Crop Insurance Froud : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरपाईसाठी गतवर्षी पीक नुकसानीचे सर्वेक्षण केलेल्या अर्जांवर हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचे आढळून आले आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरपाईसाठी गतवर्षी पीक नुकसानीचे सर्वेक्षण केलेल्या अर्जांवर हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचे आढळून आले आहे.

या प्रकरणी आयसीआयसीआय लोंम्बार्ड जनरल इन्सुरंन्स कंपनी व पिंपळदरी येथे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या पर्यवेक्षकाविरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.१८) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतवर्षी (२०२२) २३ व २४ ऑगस्ट रोजी पिंपळदरी येथील १३ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झालेले अर्ज विमा कंपनीच्या पर्यवेक्षकाने औंढा नागनाथ तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायकाच्या स्वाक्षरीसाठी दाखल केले होते.

त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी मंडळ कृषी अधिकारी जी. के. काळे, कृषी पर्यवेक्षक एस. एस. कंचले, कृषी सहायक जी. एन. गच्चे यांनी पिंपळदरी येथे जाऊन चौकशी केली. सर्वेक्षण झालेले अर्ज संबंधित शेतकऱ्यांना दाखविले. त्या वेळी १३ पैकी ८ शेतकऱ्यांनी अर्जांवर त्यांची सही खोटी असल्याचे सांगितले. ३ निरक्षर महिलांनी सही न करता त्यासाठी अंगठ्याचा ठसा वापरत असल्याचे सांगितले व तसे लेखी दिले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी १० शेतकऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. सर्व जबाबावरील सह्या व अंगठ्यांची पडताळणी केली असता आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षण अर्जांवरील १० पैकी ८ शेतकऱ्यांच्या सह्या व अंगठे खोटे असल्याचा निष्कर्ष निघाला.

जिल्हा अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी (सांख्यकी) संतोष बोथीकर यांनी बुधवारी (ता. १८) कळमनुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनी व संबंधित पर्यवेक्षकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजय रोमोड तपास करीत आहेत.

कोऱ्या अर्जांवर घेतल्या सह्या, अंगठे

शेतकरी कमल ठोंबरे, सुनीता ठोंबरे, जनाबाई ठोंबरे, मुंजाजी ठोंबरे, अंबादास ठोंबरे, श्‍यामराव ठोंबरे, आनंदराव ठोंबरे, बळिराम ठोंबरे, बबन ठोंबरे, हनवता ठोंबरे यांनी सांगितले की, कंपनीतर्फे सर्वेक्षणासाठी आलेल्या पर्यवेक्षाकाने इंग्रजी अर्ज आम्हाला समजून सांगितला नाही. ८० टक्क्यांवर नुकसान भरपाई देतो म्हणून कोऱ्या अर्जावर स्वाक्षरी घेतली. त्याबाबत जिल्हा अधिकारी, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT