DAP Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizer : माहोरा येथे बनावट डीएपी खताचा साठा पकडला

Illegal Fertilizer : तेथे अधिक चौकशीत मध्य प्रदेशातील उज्वल ॲग्रो केमिकल अॅड फर्टिलायझर्स व इतर माहिती लिहून असलेल्या पिवळ्या रंगाच्या गोण्यात खत साठा आढळून आला.

Team Agrowon

Jalna News : बनावट डीएपी खतसाठ्यावर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकली. याप्रकरणी उज्वल ऍग्रो केमिकल अँड फर्टिलायझर कंपनी, पुरवठादार भोलेनाथ छांछरिया यांच्यासह माऊली माऊली ट्रेडर्सचे केशवराव सरोदे यांच्याविरुद्ध जाफराबाद पोलिसांनी विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत सविस्तर माहितीनुसार, बनावट डीएपी शोधण्यासाठी खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी नीलेशकुमार भदाने व खत निरीक्षक तथा जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) २९ मे रोजी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील धाड रोडवरील मे. माऊली ट्रेडर्स येथे पोहचले.

त्या ठिकाणी दुकानाच्या मागे असलेल्या गोदामात त्यांना बनावट डीएपी आढळून आले नाही. मात्र, उपस्थित माऊली ट्रेडर्सचे प्रतिनिधी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी संशयित बनावट डीएपी साठा भाड्याने घेतलेल्या जिन रोड, माहोरा येथील गोदामात ठेवल्याची माहिती दिली.

तत्काळ त्या ठिकाणी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील खत निरीक्षक तथा तंत्र अधिकारी श्री. भदाने यांच्या माहितीवरून पोहचले.

तेथे अधिक चौकशीत मध्य प्रदेशातील उज्वल ॲग्रो केमिकल अॅड फर्टिलायझर्स व इतर माहिती लिहून असलेल्या पिवळ्या रंगाच्या गोण्यात खत साठा आढळून आला. त्यानंतर माऊली ट्रेडर्सचे प्रतिनिधी मधुसूदन सरोदे व मालक केशवराव एकनाथ सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या खताच्या गोण्या त्यांना भोलेनाथ रामेश्वर छांछरिया यांनी उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. त्यावरून छांछरिया याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी खत उत्पादन व विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे सांगितले.

त्यानंतर खताच्या तपासणीसाठी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. सोबतच बनावट डीएपी १८:४६:०० खत जप्त व त्या गोडाऊन मधील इतर खताना विक्री बंद आदेश देण्यात आले.

याप्रकरणी कृषी विभागाकडून श्री.भदाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून जाफराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातील उज्वल अॅग्रो केमिकल अँड फर्टीलायझर कंपनी तिचे मालक संचालक व जबाबदार व्यक्ती यांच्यासह भोलेनाथ रामेश्वर छांछरिया व माऊली ट्रेडर्सचे जबाबदार व्यक्ती केशवराव सरोदे यांचा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr. Homi Cherian: सेंद्रिय मसाला पीक उत्पादनाला प्रोत्साहन

Fake Success Story: फसव्या यशकथांचा सापळा

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

SCROLL FOR NEXT