Fertilizer Shortage : नांदेडला ११७२ टन वितरण होऊनही मिळेना डीएपी
Nanded News : आगामी खरीप पेरणीच्या काळात सर्वाधिक लागणाऱ्या डीएपी या रासायनिक खताची नांदेडला तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोमंडल कंपनीचे ११७२ टन डीएपी खत बुधवारी (ता. २१) वितरित केल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. परंतु कृषी निविष्ठा केंद्राकडून मात्र नफेखोरी करण्यासाठी शेतकऱ्यांना डीएपी खत देण्यात येत नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी लागणाऱ्या खते-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात गर्दी करत आहेत. यंदाही जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी पेरणीसाठी डीएपी या रासायनिक खताला प्राधान्य देत आहेत.
परंतु बाजारात मात्र डीएपी खत नसल्याचे कृषी विक्रेते सांगत आहेत. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना डीएपी मिळावा, यासाठी नियोजन केले आहे. यानुसार कोरोमंडल या कंपनीचा ११७२ टन डीएपी खत जिल्ह्याला बुधवारी (ता. २१) प्राप्त झाले. हे खत ठोक विक्रेत्याकडून किरकोळ विक्रेत्यांना वितरित करण्यात आले.
परंतु आजही ग्रामीण भागात कृषी निविष्ठा विक्रेते डीएपी खत नफेखोरीच्या उद्देशाने शेतकऱ्यांना देत नाहीत. या वितरणाकडे कृषी विभागाचेही दुर्लक्ष असल्याने विक्रेते ते अधिकच्या दराने विक्रीसह लिकिंगही करत असल्याची माहिती प्राप्त झाली.
जिल्ह्यात डीएपी खताचे झालेले वितरण (टनांत)
गोपाल भोकर १५, बालाजी किवळा २०, विष्णु लोहा १५, बळीराजा मारतळा ८, लक्ष्मीकांत मुदखेड १५, मारोती लोहा १०, न्यू संगमेश्वर लोहा १५, भाग्यश्री सोनखेड २०, मातोश्री नायगाव १०, जांबळेकर तामसा १०, शिवदत्त नायगाव ५, सुशांत लोंढेसांगवी १०, तिरुपती गडगा १०, मातोश्री मारतळा ८, पांडुरंग भोकर २०, विठ्ठल मालाकोली १९, गुरुकृपा माळाकोली ६, किसान कंधार ७, गोपाल भोकर १५, विलास भोकर ५, शेतकरी लोहा ८, माणिक उमरी २०, राजेश्वर कंधार १०, आराध्या गडगा १०, तुकोबाराय शिराढोण १०, मातोश्री शिराढोण १०, बालाजी मुखेड २५, पिताश्री मुखेड ५, जगदंबा मुखेड १०, श्रीनिवास जांब ५, श्रीनिवास जांब १०, गिरिराज जांब १०, कालिकादेवी बामनी फाटा १०, शिवनेरी बामनी फाटा १०, विठुमाऊली बामनी फाटा ५, साईकृपा सलगरा फाटा ८, पवन नरसी १०, श्री जयलक्ष्मी बिलोली ५, भक्ती कामरवाडी २७, श्रावणी जांब ५, अमोल जांब ५, गिरिराज जांब १०, श्रीनिवास मांडवी २०, श्रीनिवास मांडवी १२, प्रदीप निवघा बा. १५, गजानन हदगाव १०, माऊली हदगाव १०, शेतकरी लोहा २०, शिल्पा हिमायतनगर ५, गोदावरी तामसा ५, श्रीकृष्ण तामसा ५, इंद्रा रुई १०, सचिन हिमायतनगर १५, राजलक्ष्मी हिमायतनगर १०, श्रीनिवास मांडवी ८, निलेश सारखणी २०, भक्ती शेंबाळपिंरी ९, अधिराज शेंबालपिंरी ९, धनजय शेंबळपिंरी ८, भक्ती कामरवाडी ८, श्रुस्ती लोहा ५, श्रीकृपा लोहा ५, गणराज लोहा १०, हरिओम लोहा ५, मारोती लोहा ५, नवीन बालाजी लोहा १०, श्रीहरी लोहा १०, बालाजी लोहा ५, बालाजी लोहा १०, वैजनाथ लोहा १०, हरिओम लोहा ५, बालाजी कारेगाव १५, श्री साई वाई बा. २०, चेतन तामसा ८, श्रीकृष्ण तामसा ५, वसंत नायगाव १०, श्री गजानन नायगाव १०, हनुमान नायगाव ५, श्री नांदेड १०, चंद्रभागा बोधडी २०, श्रीराम किनवट २०, प्रदीप निवघा बा २५, अग्रवाल नांदेड १०, श्रीओम वारंगा १०, विशाल बामनी फाटा १०, समृद्धी हिमायतनगर ८, शिवराज वाई बा. १०, श्रीमहालक्ष्मी वाई बा. १०, साई समर्थ वाई बा १०, बालाजी मुखेड ५, केदार मनाठा १५, तिरुमला माळाकोळी ७, बालाजी माळाकोळी ७, राजे हदगाव १०, सुदर्शन निवघा बाजार १०, प्रदीप निवघा बाजार १५, गणेश हदगाव १०, उमेश तळणी ८, राधिका तळणी ८, ज्ञानेश्वरी मुखेड १०, मनीष वाई बा. १०, हरीओम इस्लापूर १०, महालक्ष्मी उंचेगाव ७ टन असा एकूण ११७२ टऩ डीएपीचे वितरण केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.