Extremely Heavy Rains Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Updates: मराठवाड्यात ५२ मंडलांत अतिवृष्टी

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडलांत पावसाने हजेरी (Heavy Rain) लावली. जिल्ह्यातील २४ मंडलांत ३० ते ६० मिलिमीटर पाऊस झाला. २५ मंडलांत २० ते ३० मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ७ मंडलांचा अपवाद वगळता इतर सर्व मंडलांत दमदार पाऊस (Heavy Rains) झाला.

अॅग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात गुरुवारी (ता १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहिला. तब्बल ५२ मंडलांत अतिवृष्टी (Extremely Heavy Rains) झाली. मध्यम, दमदार, जोरदार ते अति जोरदार झालेल्या या पावसाचा जोर नांदेड, लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांत सर्वाधिक राहिला. मराठवाड्यातील ५१ तालुक्यांत सरासरी ३० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडलांत पावसाने हजेरी (Heavy Rain) लावली. जिल्ह्यातील २४ मंडलांत ३० ते ६० मिलिमीटर पाऊस झाला. २५ मंडलांत २० ते ३० मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ७ मंडलांचा अपवाद वगळता इतर सर्व मंडलांत दमदार पाऊस (Heavy Rains) झाला.

जिल्ह्यातील १४ मंडलांत ३० ते ६१ मिलिमीटर, तर २८ मंडलांत २० ते ३० मिलिमीटर पाऊस झाला. ७ मंडलांत ४ ते २० मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडलांत जोरदार पाऊस झाला. होळ व बनसारोळा मंडलांत अतिवृष्टी (Extremely Heavy Rains) झाली. जिल्ह्यातील २६ मंडलांत ३० ते ५० मिलिमीटर, १९ मंडलात २० ते ३० मिलिमीटर तर १६ मंडलांत १० ते २० मिलिमीटर पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील सर्व ६० मंडलांत पावसाची हजेरी दमदार राहिली. लातूर, गातेगाव, कनेरी, हरंगुळ, चिंचोली या पाच मंडलांत अतिवृष्टी (Extremely Heavy Rains) झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील पावसाची हजेरी मध्यम राहिली. १६ मंडलांत ४० ते ५९ मिलिमीटर पाऊस झाला.

५१ तालुक्यांत ११२ मिलिमीटरपर्यंत पाऊस

मराठवाड्यातील औरंगाबाद, पैठण, खुलताबाद, जाफराबाद, बदनापूर, बीड, पाटोदा, गेवराई, अंबाजोगाई, केज, लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, रेणापूर, जळकोट, उस्मानाबाद, तुळजापूर, परांडा, भूम, कळंब, उमरगा, लोहारा, वाशी, नांदेड, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, नांदगाव, गंगाखेड, पाथरी, पूर्णा, पालम, सोनपेठ, मानवत, हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव आदी ५१ तालुक्यांत सरासरी ३० मिलिमीटर पेक्षा जास्त, तर सरासरी ११२ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये)

बीड जिल्हाः होळ ८९.८, बनसारोळा ८९.८

लातूर जिल्हा ः तूर ६६.८, गातेगाव ६९, कनेरी ६६.८, हरंगुळ ६६.८,चिंचोली ७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT