Crop Insurance agrowon
ॲग्रो विशेष

PM Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदवाढ

Crop Insurance Update : पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.

Anil Jadhao 

Mumbai News : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज- दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे.

अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच असून मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.

त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याचे मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्याशी संध्याकाळी ७ वाजता बैठक; बैठकीला कोण-कोण हजर राहणार?

Import Duty: पिवळा वाटाणा आयातीवर ३० टक्के शुल्क; कडधान्याचे भाव कमी झाल्याने सरकारचा निर्णय

Bacchu Kadu: ...तर आम्ही संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करु, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा, आंदोलन सुरुच

Bachhu Kadu Protest : बच्चू कडू यांच्या आंदोलनात दोन जणांना अटक; किसान सभा आणि माकपकडून सरकारचा निषेध

Sugarcane Management: थंडीचा उसावर होणारा परिणाम अन् उपाययोजना

SCROLL FOR NEXT