Vermicompost Export Agrowon
ॲग्रो विशेष

Export of Vermicompost : विदर्भातून प्रथमच गांडूळ खताची निर्यात

Vermicompost Update : विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात उत्पादित उच्चप्रतीच्या गांडूळ खत निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Akola News : स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत उद्योजकता विकास फोरमचे सदस्य कृषी पदवीधर प्रवीण वानखडे यांच्या प्रयत्नातून तथा युनिव्हर्स एक्सपोर्टचे माध्यमातून विदर्भातून कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी

तथा विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात उत्पादित उच्चप्रतीच्या गांडूळ खत निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे.

विदर्भातून अशा प्रकारे गांडूळ खत निर्यातीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या निर्यातीचे पहिले कंटेनर रवाना झाले. यावेळी कुलगुरू डाॅ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, विद्यापीठ शिक्षण विस्तार संचालक डाॅ. धनराज उंदिरवाडे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात उत्पादित उच्चप्रतीच्या गांडूळ खत निर्यात झाले. याप्रसंगी पहिल्या कंटेनरला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी समूह गटांचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर प्रा.डॉ. शिवाजी नागपुरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT